सिंधुदुर्गनगरीत आजपासून
पोलिस दल भरती प्रक्रिया

सिंधुदुर्गनगरीत आजपासून पोलिस दल भरती प्रक्रिया

सिंधुदुर्गनगरीत आजपासून
पोलिस दल भरती प्रक्रिया
ओरोस, ता. १ ः सिंधुदुर्ग पोलिस दलातील रिक्त चालक व अंमलदार मिळून १२१ पदांसाठी ८ हजार ८४ एवढे अर्ज आले आहेत. या भरतीची प्रक्रिया उद्यापासून (ता. २) सुरू होत आहे. चालक पदासाठी २ ते ४, तर अंमलदार पदासाठी ५ ते ११ जानेवारी या कालावधीत मैदानी चाचणी पोलिस मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे घेतली जाणार आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यभर रिक्त असलेल्या पोलिस चालक व अंमलदार या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात ही भरती स्वतंत्र होत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. यात चालक २२ पदासाठी दोन हजार १२६ अर्ज प्राप्त झाले आहेत. तर ९९ अंमलदार या पदासाठी पाच हजार ९५८ अर्ज प्राप्त झाले आहेत. पोलिस दल भरतीसाठी ज्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले, त्यांना ‘महाआयटी’कडून ऑनलाईन पद्धतीने ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ओळखपत्राच्या दोन प्रती, आवेदन अर्जाच्या आणि त्यांच्या छायांकित प्रतींचा संच तसेच आवेदन अर्जावर सादर केलेल्या छायाचित्रांच्या पासपोर्ट साईजच्या छायाचित्रासह बोलाविलेल्या दिवशी व वेळेत पोलिस मुख्यालय सिंधुदुर्गनगरी मैदानावर उपस्थित राहावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com