दिव्यांग रूपेश पवार यांची उपसरपंचपदी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांग रूपेश पवार यांची उपसरपंचपदी निवड
दिव्यांग रूपेश पवार यांची उपसरपंचपदी निवड

दिव्यांग रूपेश पवार यांची उपसरपंचपदी निवड

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat२p१९.jpg-
KOP23L72702 विन्हे ः दिव्यांग रूपेश पवार विजयी मुद्रेत.
-----
दिव्यांग रूपेश पवार झाले विन्हेचे उपसरपंच
मंडणगड, ता. २ ः तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीची उपसरपंच निवड करण्यात आली. यामध्ये विन्हे ग्रामपंचायतीत रूपेश पवार या दिव्यांग बांधवाची उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे. ही घटना तालुक्यासाठी भूषणावह असून त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
१४ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचाच्या निवडीचा कार्यक्रम झाला. यात दुधेरे-बामणघर ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मंजुळा जाधव, तिडे-तळेघर-अरुण माने, दहागाव-रूपाली मोरे, बाणकोट-अजय नाचरे, अडखळ-सूरज पाडावे, कुंबळे-अनिल लोखंडे, विन्हे-रूपेश पवार, देव्हारे-संजीव येसावरे, लोकरवण-अशोक गोठल, मुरादपूर उपसरपंचपदी सिराज वलेले, पिंपळोली उपसरपंचपदी संदेश कवडे, शिगवण उपसरपंचपदी राजेश शिगवण, वेसवी उपसरपंचपदी आनंद भाटे, सडे उपसरपंचपदी प्रियांका यादव यांची निवड झाली.