चिपळूण ः रामपूर ग्रामीण रुग्णालय होऊनही कर्मचाऱ्यांची कमतरता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः  रामपूर ग्रामीण रुग्णालय होऊनही कर्मचाऱ्यांची कमतरता
चिपळूण ः रामपूर ग्रामीण रुग्णालय होऊनही कर्मचाऱ्यांची कमतरता

चिपळूण ः रामपूर ग्रामीण रुग्णालय होऊनही कर्मचाऱ्यांची कमतरता

sakal_logo
By

फोटो ओळी
-ratchl२४.jpg ःKOP23L72704 चिपळूण ः रामपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र.
----------------
रामपूर ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कमतरता
सर्जन, बालरोगतज्ज्ञ नाहीत ; २६ गावांसाठी उपयोगी
चिपळूण, ता. २ ः तालुक्यातील रामपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळाला खरा; परंतु या दर्जानंतर कर्मचाऱ्यांच्या संख्येत कोणताही बदल झालेला नाही. या रुग्णालयात एप्रिल ते डिसेंबर २०२२ अखेर एकूण ७ हजार ९९८ रुग्णांची तपासणी झाली. परिसरातील २६ गावातील लोकं येथे तपासणीसाठी येत असतानाही तज्ञांच्या नेमणूका झाल्या नाहीत. आरोग्य केंद्राचा दर्जा बदलला तरी मिळणाऱ्या आरोग्य सुविधेत मात्र वाढ झालेली नाही.
रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारित रामपूर, चिवेली, बामणोली, बोरगाव, मजरेकौंढर, लोणारी, वाघिवरे, कौंढरताम्हाणे, मार्गताम्हाणे खुर्द, मार्गताम्हाणे बुद्रुक, कळमुंडी, उमरोली, डुगवे, तनाळी, उबळे, विराटगाव, आंबेरे, शिरवली, मिरवणे, देवखेरकी, पाथर्डी, गुढे, डुगवे, कात्रोली, कुंभारगाव ही २६ गावे येतात. याशिवाय गुहागर तालुक्यातील कुटगिरी, पाभरे, पाली येथील रुग्णही रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी येतात. चिपळूण-गुहागर तालुक्यांना जोडणारे रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. धनराज मुंढे, डॉ. निकिता शिर्के हे नियमितपणे येथे आरोग्यसेवा देतात. या रुग्णालयात एप्रिल ते डिसेंबर २०२२ अखेर एकूण ७ हजार ९९८ रुग्ण तपासणी झाली. रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम प्रगतीपथावर आहे. आमदार भास्कर जाधव यांनी सतत प्रयत्न करून आरोग्य मंत्रालयाकडून रामपूर ग्रामीण रुग्णालय मंजूर केले; परंतु अद्यापही रत्नागिरी आरोग्य विभागाकडून ग्रामीण रुग्णालय असा बोर्डवर उल्लेख नाही.
रामपूर ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. ग्रामीण रुग्णालयात सर्जन, बालरोगतज्ञ, इतर तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती झालेली नाही. या रुग्णालयात औषधनिर्माता अधिकारी नाही, टेक्निशियन नाही. २६ गावात मधुमेह रुग्ण, क्षय अन्य रुग्णांना रक्त, लघवी, थुंकी तपासणी करावयाची असते; परंतु टेक्निशियन नसल्यामुळे रुग्णांची कुचंबणा होते. बामणोली, उभळे, गुढे या उपकेंद्रात आरोग्यसेविका, आरोग्यसेवक नाहीत तर रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक नाहीत. कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण अधिक आहे.
या रुग्णालयात एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत विंचूदंश १६५, सर्पदंश १६, श्वानदंश ४३, इतर दंश ६ तर एप्रिल ते डिसेंबर २०२२ पर्यंत विंचूदंश १३४, सर्पदंश १७, श्वानदंश ८९, इतर दंश १३ झालेल्या रुग्णांवर योग्य उपचार करण्यात आले. ६४ महिलांवर कुटुंब कल्याणची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. दर महिन्याला येथे कुटुंब कल्याण शिबिरे घेतली जातात. रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २६ गावातील १९ हजार नागरिकांना कोविड डबल डोस देण्यात आली. कोविड लसीकरण ९८ टक्के पूर्ण झाले असून, बूस्टर डोस ७० टक्के लोकांनी घेतला आहे.
------------
चौकट
रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळाला. सध्या केवळ नामकरण झाल्याची स्थिती आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या नियमानुसार तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यास २६ गावातील लोकांना त्याचा मोठा लाभ होण्यास मदत होईल.
- अनिलकुमार जोशी, रामपूर