लोकवर्गणीतून तयार केला रस्ता

लोकवर्गणीतून तयार केला रस्ता

rat०२५.txt

(पान ५ साठी, अॅंकर)

फोटो ओळी
-rat२p१३.jpg ः
७२६५७
खेड ः घेरारसाळगड-जानकरवाडी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून तयार केलेला रस्ता.
---

अमृत महोत्सवातही सुविधांसाठी संघर्ष

घेरारसाळगड-जानकरवाडी ; लोकवर्गणीतून होतोय रस्ता

खेड, ता. २ ः तालुक्यातील सह्याद्री पर्वताच्या कुशीत किल्ले सुमारगडच्या पायथ्याशी घेरारसाळगड-जानकरवाडी वसली आहे. स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षांनंतरही रस्ता व पाणी या मुलभूत सुविधा मिळवण्यासाठी ग्रामस्थ संघर्ष करत आहेत. या धनगरवाडीच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. शासन दखलच घेत नसल्याने ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून रस्ता तयार केला आहे.
घेरारसाळगड -जानकरवाडीला रस्ता व पाणी या मुलभूत सुविधा मिळवण्यासाठी वाडीतील ग्रामस्थांचा मागील अनेक वर्षापासून शासनदरबारी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू आहे. शेवटी शासन दखल घेत नसल्याने वाडीतील सर्व कुटुंबानी लोकवर्गणी काढून रस्ता बनवावा लागतो, ही दुर्दैवी बाब असल्याचे महाराणी आहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी सांगितले. घेरारसाळगड जानकरवाडी कच्चा रस्त्याने वाडीमालदे गावाला जोडण्याचा प्रयत्न स्थानिक ग्रामस्थांचा सुरू आहे. हाच रस्ता भविष्यात पक्का झाल्यास शिवभक्त व पर्यटकांना किल्ले सुमारगड येथे जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून उपयुक्त होणार आहे.
वाडीमालदे ते घेरारसाळगड जानकरवाडी या ४ किमीच्या रस्त्याचे काम लोकवर्गणीतून सुरू आहे. या वाडीची पाणी व रस्ता या सुविधेची जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन घेरारसाळगड-जानकरवाडीला विकासाच्या मुलभूत सुविधा मिळवून देण्यास सहकार्य करावे, असे आवाहन महाराणी आहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी केले आहे.

पाण्याचा झरा असूनही टंचाई

घेरारसाळगड-जानकरवाडी येथे आयनाचे पाणी या नावाचा डुरा असून येथे पाण्याचा जिवंत झरा आहे. या डुऱ्‍याचे वृद्धीकरण व आरसीसी बांधकाम करून मिळाल्यास या वाडीची पाणी समस्या कायमची सुटू शकते. परंतू त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com