rat0244.txt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rat0244.txt
rat0244.txt

rat0244.txt

sakal_logo
By

फोटो-
rat२p३२.jpg-KOP२३L७२७४८ रत्नागिरी ः शहरातील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर सुरू झालेल्या पोलिस भरती प्रक्रियेसाठी आलेले उमेदवार.
rat२p३३.jpg-L७२७४९ उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करताना पोलिस कर्मचारी.
------

पोलिस भरतीला पहिल्या दिवशी ३५० उमेदवार हजर

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ ः अनेक दिवस रेंगाळलेली पोलिस भरती प्रक्रिया आज रत्नागिरीत शहरातील मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे आज सकाळी सहाच्या सुमारास सुरवात झाली. स्टेडियमवर पोलिस भरती अत्यंत कडेकोट पोलिस बंदोबस्तात सुरु आहे.
जिल्ह्यात होणाऱ्या १३१ जागांसाठीच्या पोलिस भरतीची सोमवारी (ता. २) सुरवात झाली. भरतीच्या पहिल्याच दिवशी साडेतीनशे उमेदवार हजर होते. पुढील दहा दिवस ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. राज्यात गृहविभागाने तब्बल १८ हजार पोलिस कर्मचाऱ्यांची पदे भरण्याची घोषणा केली आहे. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यात १३१ पदांसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे. यात खुल्या वर्गासाठी १८ ते २८ वर्षे, मागासवर्गीय १८ ते ३३ वर्षे वयाची अट आहे. कोकणात ठाणे ग्रामीण ६८, रायगड २७२, पालघर २११, सिंधुदुर्ग ९९, रत्नागिरी १३१ जागांचा समावेश आहे. प्रत्यक्ष भरतीला आजपासून सुरवात झाली. पहिल्याच दिवशी साडेतीनशे उमेदवार हजर होते. पहिल्याच दिवशी अनेक उमेदवारांनी भरती प्रक्रियेकडे पाठ फिरवली. हजर उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. या भरती प्रक्रियेकडे स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष ठेवून होते. या पोलिस भरती प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवार रत्नागिरीत दाखल झाले असून भरतीच्या सर्व प्रक्रियेचे व्हिडीओ शुटींग केले जात आहे. तसेच उमेदवारांच्या सर्व कागदपत्रांची बारकाईने छाननी केली जात आहे. त्यामुळे ही सर्व चाचणी योग्य पद्धतीने व्हावी यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.