वेशभूषा पेंटर सोहनींमुळे शक्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेशभूषा पेंटर सोहनींमुळे शक्य
वेशभूषा पेंटर सोहनींमुळे शक्य

वेशभूषा पेंटर सोहनींमुळे शक्य

sakal_logo
By

rat0318.txt

( टुडे पान 3)

थोरांच्या वेशभूषा पेंटर सोहनींमुळे शक्य

रत्नागिरी, ता. 3 ः कॉलेज जीवनातील २००३ मध्ये स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची वेशभूषा करायचे ठरले तेव्हा वेशभूषेसाठी एकच नाव समोर आले ते सोहनी पेंटर यांचे. गाडीतळावरील त्यांच्या दुकानात गेलो आणि योग्य वेशभूषा मला मिळाली. अकरावीपासून नंदू सोहनी यांच्याशी ओळख होतीच. त्यामुळे वेशभूषेचे साहित्य परत देण्यास उशिरा झाला तरी मला एक्स्ट्रा फीमधून सूट मिळायची, अशी सोहनी यांची आठवण रंगकर्मी दुर्गेश आखाडे यानी जागवली. नंदू सोहनी उर्फ सोहनी पेंटर यांचे काल निधन झाले. त्याना श्रद्धांजली वाहताना आखाडे म्हणाले, 2004 ला कॉलेज डेजमध्ये मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची वेशभूषा करायचं ठरवलं. ही वेशभूषा आव्हानात्मक होती; पण मोठ्या विश्वासाने नंदू सोहनी यांच्याकडे गेलो. काय हवे आहे ते सांगितल्यावर त्यांनी अगदी योग्य साहित्य दिले; पण सोहनींकडे काळा गॉगल नव्हता. त्याच्यासाठी सर्व गॉगलची दुकाने, ऑप्टिशियनकडे शोधाशोध केल्यावर तसा गॉगल मला राजेंद्रप्रसाद मसुरकर यांच्याकडे मिळाला. त्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची वेशभूषा मी करू शकलो. त्यानंतर पुढे तीनवेळा मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची वेशभूषा केली. अर्थात्, नंदकुमार सोहनी यांचे सहकार्य होतेच. त्यानंतर कोकणी माणूस साकारतानाही नंदू सोहनी यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या दुकानात गेल्यावर अनेक विषयावर गप्पा रंगायच्या. खूप उत्साही आणि संवेदनशील माणूस असे त्यांचे व्यक्तीमत्व असल्याचे त्यांनी सांगितले.