लम्पीबाबत जनजागृतीसाठी तालुक्यातील 11 मंडलात विशेष कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लम्पीबाबत जनजागृतीसाठी तालुक्यातील 11 मंडलात विशेष कार्यशाळा
लम्पीबाबत जनजागृतीसाठी तालुक्यातील 11 मंडलात विशेष कार्यशाळा

लम्पीबाबत जनजागृतीसाठी तालुक्यातील 11 मंडलात विशेष कार्यशाळा

sakal_logo
By

rat०३२१.txt

( टुडे पान ३ )

लम्पीबाबत जागृतीसाठी कार्यशाळा

चिपळूण तालुका ;आतापर्यंत ८ जनावरांचा बळी

चिपळूण, ता. ३ ः लम्पी आजारामुळे आतापर्यंत तालुक्यातील ८ जनावरांचा बळी गेला. प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून, लम्पीचा संसर्ग रोखण्यासाठी कंबर कसली आहे. याच धर्तीवर प्रांत कार्यालयात आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत उपाययोजनांवर चर्चा करताना शेतकऱ्‍यांना मार्गदर्शन करून लम्पी आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी तालुक्यातील ११ मंडलात विशेष कार्यशाळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. गावस्तरावरही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

रत्नागिरी तसेच चिपळूण तालुक्यातही लम्पी आजाराची लागण झालेली जनावरे आढळली आहेत. पशुसंवर्धन विभागाने अशा जनावरांवर औषधोपचार सुरू केला आहे तसेच लसीकरणावरही भर दिला आहे. उपचार सुरू असतानाच लम्पी आजाराने विविध गावातील ८ जनावरे दगावल्याची माहिती पुढे आली आहे. लम्पीचा संसर्ग वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. पशुधन लम्पीला बळी पडत असल्याने शेतकऱ्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या आजारादरम्यान शेतकऱ्‍यांनी नेमकी आपल्या जनावरांची कशी काळजी घ्यावी, काय उपाययोजना कराव्यात, कोणत्या सूचनांचे पालन करावे या संदर्भात त्यांना मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. यावर गांभीर्याने विचार करून प्रशासनाने मंगळवारी प्रांत कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीला आमदार शेखर निकम, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. धनंजय जगदाळे, डॉ. सुधीर कानसे, वि. स. बारापात्रे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, रमेश राणे यांच्यासह काही शेतकरीही उपस्थित होते. या बैठकीत लम्पी आजाराच्या आणि लम्पीसदृश जनावरांवर कोणत्या आणि कशाप्रकारे औषोधोपचार सुरू आहेत, याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली. लम्पीचा संसर्ग रोखण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात यावर सविस्तर चर्चा झाली. औषोधोपचारासह लसीकरणावर भर देण्याच्या सूचना आमदार निकम यांनी केल्या. शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

११ मंडलात कार्यशाळा...
तालुक्यातील ११ मंडलात कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. ग्रामस्तरावर ग्रामसेवक व पशुसंवर्धन विभागातील अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांना गावात फिरूनही मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्‍यांनी आपली जनावरे मोकाट सोडू नयेत, अशा सूचनाही केल्या जाणार आहेत.
------------