
आचरा न्यू इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
swt329.jpg
72955
आचराः स्नेहसंमेलनात मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय डौर.
आचरा न्यू इंग्लिश स्कूलचे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
आचरा, ता. ३ः समाज व्यवस्था, जातीव्यवस्थेतून निर्माण झालेली स्पृश्यास्पृश्यता याचा फायदा उठवत इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्षे राज्य केले. विद्यार्थ्यांनी भारताचे आधारस्तंभ या नात्याने अशा अनिष्ट प्रथांना मूठमाती देण्याचे आवाहन नागरी हक्क संरक्षण विभाग सिंधुदुर्गचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय डौर यांनी आचरा हायस्कूल येथे केले.
दी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कूल आचराच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुलांनी प्रसिद्ध केलेल्या ''उगम'' अंकाचे डौर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी अध्यक्षा नीलिमा सावंत, मुंबई समिती सचिव अशोक पाडावे, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य राजन पांगे, बाबाजी भिसळे, अर्जुन बापर्डेकर, संजय पाटील, मुख्याध्यापक गोपाळ परब, चरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बळीराम सुतार, पोलिस उपनिरीक्षक चव्हाण, वायंगणी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक पेडणेकर, सुरेश गावकर, इंग्लिश मीडिअम स्कूलच्या प्रिन्सिपल मायलीन फर्नांडीस, मॅनेजमेंट स्कूलचे दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन मधुरा माणगावकर यांनी, आभार गुटूकडे यांनी मानले.