कलर बेल्ट स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कलर बेल्ट स्पर्धा
कलर बेल्ट स्पर्धा

कलर बेल्ट स्पर्धा

sakal_logo
By

rat०३१३.txt

बातमी क्र..१३ ( पान २ संक्षिप्त)

rat३p१५.jpg ः
७२८७४
लांजा ः तायक्वांदो फिटनेस अॅकॅडमी लांजाच्या विद्यार्थ्यांसह परीक्षक, संघटनेचे पदाधिकारी.

तायक्वांदो कलर बेल्ट परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश

लांजा ः लांजा तायक्वांदो फिटनेस अॅकॅडमी लांजाची पहिली तायक्वांदो कलर बेल्ट परीक्षा नुकतीच घेण्यात आली. यामध्ये यलो बेल्टकरिता १४ व ग्रीन बेल्ट ३ तसेच ब्लू बेल्ट- २ तसेच रेड बेल्ट १ अशाप्रकारे सहभाग नोंदवला. यामध्ये पार्थ तेंडुलकर, सवाब जमादार, स्वर्णिम शेट्ये, फरहाना जमादार, मृणाल यादव, यास्मीन जमादार, श्रीराज जाधव, सार्थक झोरे, नियाज जमादार, पृथ्वीराज श्रीमान‌गौर,आर्या पवार, आदिश्री शेटये, शीतल आचरेकर, विराज जाधव या मुलांनी लांजा तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट असोसिएशन व तायक्वांदो फिटनेस अॅकॅडमी लांजा यांच्या सहकार्याने परीक्षक म्हणून रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट असोसिएशनचे सचिव व लक्ष्मण कररा यांच्या मार्गदर्शनाखाली काळे-कुळकर्णी छात्रालय लांजा येथे घेण्यात आली. या विद्यार्थ्यांना लांजा तालुका तायक्वांदो प्रमुख प्रशिक्षक तेजस पावसकर, तेजस्विनी आचरेकर, गौरव खेडेकर हे प्रशिक्षण देत आहेत.
--

परवाना चिरेखाणीचा आणि उत्खनन बॉक्साईटचे

संगमेश्वर ः संगमेश्वर तालुक्यात एका गावामध्ये परवाना चिरेखाणीचा आणि उत्खनन बॉक्साईटची होत असल्याची चर्चा असून रात्रीस खेळ चालत असल्याचे बोलले जात आहे. संगमेश्वर तालुक्यातील एका गावामध्ये चिरेखाणीची परवानगी घेऊन रात्रीच्यादरम्यान बॉक्साईटचे मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असल्याची चर्चा आहे. रात्रीच्या दरम्यान बॉक्साईटच्या गाड्या भरून त्या पूर्ण भरून आणल्या जातात. बाराचाकी असलेल्या गाड्या पूर्ण भरून त्यावर कापड टाकले जात असल्याची चर्चा आहे. चिरेखाणीच्या नावावर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या बॉक्साईटच्या वाहतुकीला कुणाचा आशीर्वाद आहे, याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
--

स्वच्छ परिसर ठेवू सोसायटी सुंदर

रत्नागिरी ः शहरातील खालची आळी परिसरात सुप्रसिद्ध असलेली आदर्शवत सोसायटी म्हणून ओळखली जाणारी कोहिनूर हेरिटेज, सी विंगची सोसायटी ही वर्षभर नवनवीन सामाजिक उपक्रम राबवत असते. १ जानेवारीला इंग्रजी नववर्षाच्या पहाटे सोसायटी अध्यक्ष सतीश महाडिक यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या वेळी इमारतीच्या सभोवतीच्या परिसरात वाढलेले रान व केरकचरा काढून संपूर्ण परिसर तसेच इमारत पार्किंग, इमारतीवरील टेरेस स्वच्छ करून पाण्याने धुवून काढण्यात आले. या अभियानात सोसायटीमधील रहिवासी बहुसंख्येने सहभागी झाले होते. ७ जानेवारीला सोसायटीमध्ये आयोजित केलेल्या सत्यनारायण पुजेच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असून तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन अध्यक्ष महाडिक व कमिटीच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नववर्षाच्या पहाटेला स्वछता अभियान कार्यक्रमाने एक चांगली सुरवात करण्यात आली.
--


प्राचार्य मणेर यांचा सत्कार

संगमेश्वर ः एज्युकेशन सोसायटी संचलित, न्यू इंग्लिश हायस्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेज, कसबा-संगमेश्वर या शाळेचे प्राचार्य निसार अयुब मणेर हे ३१ डिसेंबर २०२२ ला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. कसबा हायस्कूलमध्ये गेली ३५ वर्षे गणित व विज्ञान विषयाचे अध्यापन करताना त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना घडवले आहे. देश-विदेशात नोकरी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी सरांना सेवापूर्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचा गणित विषयात हातखंडा आहे. क्लिष्ट गणिते सहज, सोप्या पद्धतीने सोडवून त्यांनी विद्यार्थ्यांमधील गणित विषयाची भीती दूर केलेली आहे. त्यांनी आपल्या ३५ वर्षाच्या सेवाकाळात १४ वर्ष प्राचार्यपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. नेतृत्वकुशलतेने शाळेच्या चतुरस्र विकासात त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने संस्था व शाळेच्यावतीने भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सोहळ्यास संगमेश्वर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व फुणगूस हायस्कूलचे मुख्याध्यापक पाटील, पैसाफंड हायस्कूलचे शेट्ये, तालुक्यातील अनेक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, अध्यापक संघ व शिक्षकभारती या संघटनेचे पदाधिकारी यांची लक्षणीय उपस्थिती होती. सेवापूर्ती सोहळ्यात विद्यालयातील आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, इतर शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
---

rat३p१४.Jpg ः

गावतळे ः आवाशी येथे बालिकादिन साजरा करण्यात आला.

आवशी येथे बालिकादिन साजरा
गावतळे ः सावित्रीमाईंमुळेच महिला सक्षमी झाल्या असे दापोली तालुक्यातील आवाशी नं. १ शाळेत पार पडलेल्या बालिकादिनी सोहळ्यात प्रमुख अतिथी, ग्रामविकास अधिकारी रूपेश शिंदे यांनी मत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थान ५वीतील बालिका पडवेकर हिने भूषवले. त्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई यांचा जीवनपट मनोगतातून मांडला तर सहशिक्षक प्रकाश कांबरे यांनीही सावित्रीबाईंबद्दल सखोल मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते शाळेतील दत्तक पालक योजनेतील लाभार्थी विद्यार्थिनीनां त्यांचे लाभ देण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक सुरेश पाटील आणि सर्व विद्यार्थी, शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.
--