
क्राईम पट्टा
rat०३४०. txt
(पान ३ साठी)
सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यास दंड
रत्नागिरी ः शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुरूगवाडा येथे गस्त सुरू असताना सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. प्रितम दिगंबर गोवेकर (वय ३४, रा. झाडगाव नाका, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. ही घटना २० नोव्हेंबरला २०२२ रात्री ८ वाजता निदर्शनास आली होती. शहर पोलिस निरीक्षक विनित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आकाश भोसले, पोलिस हेडकॉन्स्टेबल पालांडे, कांबळे असे गस्त घालत असताना मुरूगवाडा येथील देशी दारूच्या दुकानासमोरील वाळूवर संशयित मद्य प्राशन करत असताना निदर्शनास आला होता. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल दिनेश हरचकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. तपासात पोलिसांनी संशयितास अटक करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. मंगळवारीआज (ता. ३) या खटल्याचा निकाल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माणिकराव सातव यांच्या न्यायालयात झाला.
----
मटका जुगार अड्डयावर कारवाई
रत्नागिरी ः शहरातील मारूती मंदिर परिसरात अवैध मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश श्रीपत मयेकर (वय ५२, रा. आंबेशेत-कर्ला, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. हा प्रकार सोमवारी (ता. २) दुपारी पावणेतीनच्या सुमारास निदर्शनास आला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित स्टेडियमच्या पाठीमागील बाजूस मच्छीमार्केट शेजारी बंद टपरीच्या आडोशाला मटका जुगाराचे साहित्य व रक्कम बाळगलेल्या स्थितीत सापडला. या प्रकरणी पोलिस नाईक आशिष भालेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.