कुडाळमधील डंपर वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळमधील डंपर वाहतूक
पर्यायी मार्गाने वळविणार
कुडाळमधील डंपर वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणार

कुडाळमधील डंपर वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणार

sakal_logo
By

कुडाळमधील डंपर वाहतूक
पर्यायी मार्गाने वळविणार
कुडाळ, ता. ३ : आठवडा बाजारच्या पार्श्वभूमीवर उद्या (ता. ४) शहरातून होणारी डंपर वाहतूक इतर मार्गावरून वळविण्यात येणार आहे. नागरिकांनी तसेच वाहतूकदारांनी या आदेशाचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा आफरीन करोल यांनी केले आहे. शहरात बुधवार या आठवडा बाजाराच्या दिवशी तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी येतात. यावेळी पोलिस ठाणे ते नवीन एसटी डेपोपर्यंत रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते. यामुळे मालवण-कुडाळ मार्गावरून होणारी डंपरची वाहतूक आठवडा बाजारदिवशी इतर मार्गावरून वळविण्याबाबतचा पत्रव्यवहार नगरपंचायतीकडून नगराध्यक्षा आफरीन करोल यांच्या स्वाक्षरीने तहसीलदारांकडे ६ डिसेंबरला करण्यात आला होता. या पत्रात आठवडा बाजाराच्या दिवशी पोलिस ठाणे ते नवीन एसटी डेपोपर्यंत रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते. तसेच पोस्ट कार्यालयासमोर मालवण-कुडाळ मार्गावरून वाळू, चिरे तसेच इतर अवजड सामानाची नियमित वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे वाहतून कोंडी होते. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. आठवडा बाजाराच्या दिवशी या रस्त्यावरून होणारी डंपर वाहतूक इतर मार्गाने वळवावी, अशी मागणी केली होती.