कणकवलीत महिल स्वच्छतागृहाची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीत महिल स्वच्छतागृहाची मागणी
कणकवलीत महिल स्वच्छतागृहाची मागणी

कणकवलीत महिल स्वच्छतागृहाची मागणी

sakal_logo
By

73172
कणकवली : शहरात महिलांसाठी शौचालय उभारणी मागणीचे निवेदन साद टीमच्यावतीने आज तहसीलदार रमेश पवार यांना देण्यात आले.

कणकवलीत महिला स्वच्छतागृह उभारा

साद टीम, ‘लोकराजा शाहू संविधान’ची मागणी; तहसीलदार, नगराध्यक्षांना निवेदन


कणकवली, ता.४ : शहरात महिलांसाठी सुसज्‍ज स्वच्छतागृहाची उभारणी करा, अशी मागणी साद टीम आणि लोकराजा शाहू संविधान केंद्राच्या कार्यकर्त्यांनी आज केली. याबाबतचे निवेदन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे आणि तहसीलदार रमेश पवार यांना देण्यात आले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या औचित्‍यावर साद टीम, अनुभव शिक्षा केंद्र आणि लोकराजा शाहू संविधान संवाद केंद्राचे पदाधिकारी सहदेव पाटकर, श्रेयश शिंदे, विशाल गुरव, सुजय जाधव, रुपाली कदम, अमित राऊळ आदींनी तहसीलदार रमेश पवार, नगराध्यक्ष समीर नलावडे यांची भेट घेतली. यावेळी कणकवली शहरात मध्यवर्ती ठिकाणी महिलांसाठी सुसज्‍ज स्वच्छतागृह उभारणीबाबतचे निवेदन दिले. तसेच शहरातील बसस्थानक, भाजी मार्केट, मच्छी मार्केट या ठिकाणी असलेल्‍या स्वच्छतागृहांची सफाई करून ती सुसज्‍ज ठेवावीत असेही आवाहन करण्यात आले.
--
नगराध्यक्षांकडून दखल
नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी शहरातील भालचंद्र आश्रम संस्थान लगतच्या जागेत तसेच बाजारपेठेमध्ये स्वच्छतागृहाच्या उभारणीबाबत कार्यवाही सुरू आहे. तर महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांशी चर्चा करून उड्डाणपुलाखालील स्वच्छतागृह उभारणीबाबत लवकरच कार्यवाही करू, अशी ग्‍वाही दिली.