रत्नागिरी-दररोज वीस टन प्लास्टिक कचर्‍यावर प्रक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-दररोज वीस टन प्लास्टिक कचर्‍यावर प्रक्रिया
रत्नागिरी-दररोज वीस टन प्लास्टिक कचर्‍यावर प्रक्रिया

रत्नागिरी-दररोज वीस टन प्लास्टिक कचर्‍यावर प्रक्रिया

sakal_logo
By

rat४p२२.jpg-
७३१९५
रत्नागिरीः प्लास्टिक प्रक्रिया प्रकल्पासाठी नाचणे येथील जागा पाहणी करताना स्वच्छता विभागाचे अधिकारी.
------------
स्वच्छ भारत अभियान.......लोगो

दररोज २० टन प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया
प्रत्येक तालुक्यात एक प्रकल्प; सव्वादोन कोटी मंजूर
रत्नागिरी, ता. ४ ः प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत नऊ तालुक्यात प्रत्येक एका ग्रामपंचायतीत संकलन आणि प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज सुमारे २० टन प्लास्टिक कचरा संकलित करून कच्चा माल तयार करून तो प्रक्रियेसाठी खासगी कंपन्यांना दिला जाणार आहे. प्रकल्पासाठी एका ग्रामपंचायतीला २५ लाखप्रमाणे सव्वादोन कोटी रुपये मंजूर झाले असून त्याला प्रशासकीय मान्यताही मिळालेली आहे.
प्लास्टिक कचरा निमुर्लनाचे मोठे आव्हान शासनापुढे आहे. ते नष्ट होत नसल्यामुळे पुनर्वापरावर भर देण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छता अभियानातून जिल्हा परिषद स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग तालुकास्तरावर प्रकल्प राबवणार आहे. यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी विशेष प्रयत्न केले होते. आता विद्यमान जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, सीईओ कीर्तीकिरण पुजार हे पाठपुरावा करत आहेत. रत्नागिरी जिल्हा डोंगराळ असल्याने गावागावातील प्लास्टिक संकलनात अडचणी येऊ शकतात. यासाठी आठ ते दहा गावांचे एक क्लस्टर बनवण्यात येणार आहे. सर्व कचरा त्या गावात एका ठिकाणी संकलित करून तो प्रकल्पाच्या जागेवर आणला जाईल. प्रत्येक तालुक्यात आठ ते दहा क्लस्टर असतील. प्रकल्पासाठी २५ लाखाचा खर्च अपेक्षित असून १६ लाख स्वच्छ भारत मिशनमधून तर उर्वरित निधी पंधरा वित्त आयोग किंवा स्वनिधीतून ग्रामपंचायतीला देणार आहे. प्रकल्पासाठी नऊपैकी आठ जागा निश्‍चित असून २४ लाख ९५ हजार ९१७ रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
-------------
चौकट १
अशी होईल प्रक्रिया
संकलित केलेले प्लास्टिक डस्ट रिमुव्हरमधून स्वच्छ करून घेतले जाईल. प्लास्टिक शेडरमधून ते बारीक (क्रश) केले जाईल. बेलरमध्ये त्याचा गोळा तयार करून तो कच्चा माल प्रक्रियेसाठी खासगी कंपनीला देण्यात येणार आहे. त्यासाठी चिपळुणातील दोन, खेड व रत्नागिरीतील प्रत्येकी एक अशा चार कंपन्यांची निवड केली आहे.
----------------
चौकट २
प्रकल्प उभारण्यासाठी निवडलेली गावे
आबलोली ग्रामपंचायत (गुहागर), कुंबळे (मंडणगड), हर्णै (दापोली), खेर्डी (चिपळूण), साडवली (संगमेश्‍वर), नाचणे (रत्नागिरी), वेरवली (लांजा), कोदवली (राजापूर) या ग्रामपंचायतीत प्रकल्प उभारले जातील. खेड तालुक्यात दोन ग्रामपंचायतीचे प्रस्ताव आले असून आठ दिवसात त्यावर निर्णय होणार आहे.
------------
चौकट ३
ग्रामपंचायतीला उत्पन्नाचे साधन
प्रकल्प उभारणार्‍या ग्रामपंचायतीला कचरा प्रक्रियेतून किलोला १४ रुपये मिळू शकतात. प्लास्टिकचा कच्चा माल कंपनीला विकला जाणार आहे. यामधून वर्षाला सर्वसाधारण आठ ते दहा लाख रुपये उत्पन्न मिळू शकते तर कचरा गोळा करणार्‍या ग्रामपंचायतींनाही मोबदला मिळणार आहे.