संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

rat०४१६.txt

(पान ५ साठी, संक्षिप्त)


चोरगे महाविद्यालयाची महोत्सवासाठी निवड

चिपळूण ः डॉ. तानाजीराव चोरगे महाविद्यालयाची जिल्हास्तरीय युवा महोत्सवातून कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागस्तरीय महोत्सवासाठी निवड करण्यात आली आहे. २ जानेवारीला जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन रत्नागिरी येथे करण्यात आले होते. या महोत्सवात रत्नागिरी जिल्ह्यातून अनेक महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालय मांडकी पालवण या महाविद्यालयाने सहभाग नोंदवून कोकणातील जाखडी नृत्य सादर केले. या स्पर्धेत जिल्ह्यातून एकाच नृत्याची विभागस्तरावर कोल्हापूर येथे होणाऱ्या महोत्सवासाठी निवड करण्यात आली आहे. या नृत्याला महाविद्यालयाच्या प्राचार्या अंजली चोरगे व कोरिओग्राफर संजय भागडे यांचे मार्गदर्शन मिळाले.
---

फोटो ओळी
-rat४p९.jpg ः
७३१३७
चिपळूण ः क्रीडा महोत्सवाचे उदघाटन करताना संस्थेचे सरचिटणीस सुनील गमरे.
---
काळे माध्यमिक विद्यालयात क्रीडा महोत्सव

चिपळूण ः तालुक्यातील भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षणमंडळाच्या पेढे-परशुराम येथील आर. सी. काळे माध्यमिक विद्यालय वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात झाला. या महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अभय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते झाले. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षांतर्गत शालेय स्तरावरील क्रीडा महोत्सव विद्यालयाच्या क्रीडांगणात नुकताच पार पडला. प्रारंभी विद्यार्थी खेळाडूंना स्पर्धेविषयी शपथ देण्यात आली. कबड्डी, खो-खो, लंगडी अशा तीन क्रीडांगणावर अनुक्रमे संस्थेचे अध्यक्ष अभय सहस्त्रबुद्धे, सरचिटणीस सुनील गमरे व शालेय समितीचे चेअरमन दिलीप माळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. मोठा गट खो-खो (मुलगे ) - आठवी ब अंतिम विजेता, खो-खो (मुली)-नववी अ अंतिम विजेता, लहान गट खो-खो मुलगे-सातवी ब अंतिम विजेता, खो-खो मुली- सातवी ब अंतिम विजेता, कबड्डी मोठा गट मुलगे-नववी अ अंतिम विजेता, मुली- नववी अ अंतिम विजेता, लहान गट-कबड्डी मुलगे- सातवी ब अंतिम विजेता, मुली-सातवी अ अंतिम विजेता, लंगडी (मोठा गट) मुली-आठवी क अंतिम विजेता, लहान गट मुली सातवी ब अंतिम विजेता, लहान गट मुली (धावणे) १०० मीटर धावणे अनुक्रमे अपूर्वा गमरे, रिद्धी निवळकर, नेत्रा चाळके. लहान गट-मुलगे (१०० मी. धावणे) अनुक्रमे वेदांत पानकर, विराज आयरे, प्रथमेश मगर. ४०० मी. धावणे मोठा गट (मुलगे) अनुक्रमे अवधूत पोसनाक, साईराज पडवेकर, जिग्नेश पेडणेकर. मोठा गट-मुली ४०० मी. धावणे अनुक्रमे तनवी घडशी, सानवी पाटील, प्रतीक्षा पडवेकर. गोळाफेक लहान गट अनुक्रमे विराज आयरे, मल्हार आयरे, प्रथमेश पड्याळ. गोळाफेक मोठा गट मुलगे अनुक्रमे अथर्व पंडे, मयुरेश घाग, साईराज पडवेकर.


फोटो ओळी
- rat४p१४.jpg ः
७३१५३
सती ः बालिकादिनी चिमुकल्यांनी साकारलेला पेहराव.
--
सती चिंचघरी प्राथमिक विद्यालयात बालिकादिन

चिपळूण ः सह्याद्री शिक्षणसंस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी-चिंचघरी (सती) प्राथमिक विद्यालयात बालिकादिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक अरविंद सकपाळ यांच्या हस्ते तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई यांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या वेळी आरोही निर्मळ, स्वरा गायकवाड, शंभुराज भोसले, शौर्य पोटे, दीपिका गवळे, अन्वी दाभाडे, तन्वी राऊत, ईश्वरी मोरे, निधी वणगे, ईशा मांडवकर, आरोही जाधव, गार्गी सुर्वे, समिक्षा पोटे, आराध्या कदम, मृणाई महाडीक या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. शिक्षिका विनया नटे यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन अपूर्वा शिंदे यांनी केले.
---------------

फोटो ओळी
-rat४p१५.jpg ः
७३१५४
राजापूर ः सत्कार स्वीकारताना राजापूर नगर वाचनालयाच्या लिपिक दीपिका पवार.
-
ग्रंथालय पदवी परीक्षेत दीपिका पवार उत्तीर्ण

राजापूर ः रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघामार्फत चालवण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठामार्फत घेण्यात आलेल्या सन २०२२ च्या ग्रंथालय आणि माहितीशास्त्र पदवी परीक्षेत दीपिका पवार हिने उत्तीर्ण होत प्रावीण्य मिळवले आहे. त्याबद्दल तिचा संगमेश्‍वर येथील कसबा येथे झालेल्या रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्या ४६व्या वार्षिक अधिवेशनामध्ये मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या अधिवेशनाला आमदार शेखर निकम, जिल्हा ग्रंथालय अधिकारी येवले व अन्य मान्यवर उपस्थित होते.
--

फोटो ओळी
-rat४p१६.jpg ः
७३१५५
राजापूर ः संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुनील जठार यांचे अभिनंदन करताना निवडणूक निर्णय अधिकारी राहुल खडसे आणि संचालकमंडळ.
----
ग्रामीण सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी जठार

राजापूर ः राजापूर तालुका औद्योगिक बहुउद्देशीय ग्रामीण सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सुनील जठार यांची तर उपाध्यक्षपदी प्रतीक्षा पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. राजापूर तालुका औद्योगिक बहुउद्देशीय ग्रामीण सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. त्यानंतर मंगळवारी संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी आर. ए. खडसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला संस्थेचे संचालक सुघोष काळे, उल्हास पाळेकर, प्रकाश नाचणेकर, जयेंद्र कोठरकर, विवेक गुरव, मंगेश नागम, सुलभा शिर्सेकर आदींसह संस्थेचे सचिव माने उपस्थित होते.
---