सावित्रीबाई फुले जयंती साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावित्रीबाई फुले जयंती साजरी
सावित्रीबाई फुले जयंती साजरी

सावित्रीबाई फुले जयंती साजरी

sakal_logo
By

rat०४२९.TXT

(पान २ साठी)

वाटद कवठेवाडी शाळेत
सावित्रीबाई फुले जयंती साजरी

रत्नागिरी ः तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेत प्रथम शिक्षिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक माधव अंकलगे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्राचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक गोविंद भाऊराव डुमनर यांनी केले तर बालरक्षक विश्वनाथ शिर्के, शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ भाऊ धनावडे यांनी मनोगत व्यक्त करत अभियानाला शुभेच्छा दिल्या. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, किल्ले बांधणी, विद्यार्थ्यांची व महिलांची मोफत आरोग्य तपासणी, विद्यार्थी व महिलांसाठी मार्गदर्शनपर व्याख्याने इत्यादी उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.