संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

विरेश्वर विद्यालयात स्नेहसंमेलन
दाभोळ ः विरसई येथील विरेश्वर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे ‘चाहूल 2023’ चे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा, रंगावली स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, प्रदर्शनाचे आयोजन, विविध स्पर्धामधील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिस व गुणगौरव समारंभ, आदर्श विद्यार्थी व विद्यार्थिनी पुरस्कार वितरण, विद्यार्थ्यांच्या नृत्यनाट्य इ. कलागुणांना वाव देण्यासाठी विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विरसई जनसेवा मंडळाचे उपाध्यक्ष विठ्ठल माने, सहसचिव संदीप राणे, खजिनदार राजेश राणे, सदस्य विलास राणे, मंगेश पिंपळकर, शालेय समिती अध्यक्ष दिलीप राणे, खरवते गावातील पालकवर्ग, विद्यार्थी व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
---------------
rat5p7.jpg ःKOP23L73387 दापोली ः विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा निषेध करताना भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

दापोलीत अजित पवार यांचा निषेध
दाभोळ ः दापोली तालुका भाजपकडून विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेध करण्यात आला. दापोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या आवाराबाहेर भाजपा जिल्हा कार्याध्यक्ष केदार साठे, महिला आघाडीच्या स्मिता जावकर, नगरसेविका जया साळवी यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध करण्यात आला. जिल्हा सरचिटणीस संजय सावंत, शहराध्यक्ष संदीप केळकर, स्वरूप महाजन, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अजय शिंदे, उदय जावकर, रवींद्र गायकवाड, प्रसाद मांडवकर, अमोल तांबे, अजय साळवी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

rat5p8.jpg ः KOP23L73388 आंजर्ले ः येथील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेला विद्यार्थी.

आंजर्ले येथे विज्ञान प्रदर्शन
दाभोळ ः पंचायत समिती शिक्षण विभाग दापोली आणि एम. के. इंग्लिश स्कूल आंजर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने 50वे तालुकास्तरीय सुवर्ण महोत्सवी विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आज एम. के. इंग्लिश स्कूल आंजर्ले येथे करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात विज्ञानदिंडीने करण्यात आली. विविध वेशभूषेत विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यानंतर विद्यार्थ्यांकडून उपस्थित मान्यवराना पारंपरिक पद्धतीने मानवंदना दिली. या उद्घाटन सोहळ्यासाठी व्यासपीठावर दापोलीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील खरात, गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, आंजर्लेच्या सरपंच स्वप्नाली पालशेतकर, मंगेश महाडिक, मुख्याध्यापक संदीप गोरिवले, शिक्षण विभागातील सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विविध संघटनांचे अध्यक्ष उपस्थित होते. दापोलीचे आमदार योगेश कदम यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.
----------

rat5p9.jpg ःKOP23L73389 साखरपा ः सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंच्या वेशभूषेत विद्यार्थी.

कबनुरकर स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती
साखरपा ः क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती कबनुरकर स्कूलमध्ये साजरी करण्यात आली. कबनुरकर इंग्लिश मीडियम स्कूल येथे बालिकादिन म्हणून साजरी करण्यात आली. अध्यक्षा म्हणून स्नेहल घागरे आणि मनसी सुर्वे उपस्थित होते. सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित माहिती सांगितली. वर्गशिक्षिका स्वरूपा बंडबे यांच्या मार्गदर्शखाली सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी स्त्रीशीक्षणाचे महत्व पटवून देणारी नाटिका सादर केली. त्यानंतर शिक्षिका शिल्पा होनाळे यांनी त्यांच्या वक्तव्यातून सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी स्त्रीशिक्षणासाठी घेतलेल्या अथक प्रयत्नाची कथा तसेच ओवी मुलांना ऐकवली.