8 जानेवारीपासून संगीत नाट्यस्पर्धेचे सीझन तिकीट विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

8 जानेवारीपासून संगीत नाट्यस्पर्धेचे सीझन तिकीट विक्री
8 जानेवारीपासून संगीत नाट्यस्पर्धेचे सीझन तिकीट विक्री

8 जानेवारीपासून संगीत नाट्यस्पर्धेचे सीझन तिकीट विक्री

sakal_logo
By

rat०५२१. txt

(पान २ साठी)

(राज्य नाट्य स्पर्धा लोगो)

संगीत नाट्यस्पर्धेचा पडदा २३ जानेवारीला उघडणार

८ जानेवारीपासून सीझन तिकिट ; महाराष्ट्र-गोव्यातील २६ नाटके

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ६१व्या संगीत राज्य नाट्यस्पर्धा २३ जानेवारी ते १८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत मारूती मंदिर येथील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात सायंकाळी ७ वा. रंगणार आहेत. संगीत नाट्यस्पर्धेला दरवर्षी रत्नागिरीत मिळणारा भरभरून प्रतिसाद लक्षात घेता नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीची सीझन तिकीट विक्री येत्या ८ जानेवारीपासून सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत नाट्यगृहात होणार असल्याची माहिती स्पर्धा समन्वयक नंदकिशोर जुवेकर यांनी दिली.

राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, अहमदनगर, सांगली व गोव्यासह २६ संगीत नाट्यप्रयोग रसिकांना पाहावयास मिळणार आहेत. या वेळी महिला दिग्दर्शकांनीही संगीतनाट्याचे धनुष्यबाण उचलले आहे. संगीत नाट्यस्पर्धेची ही अंतिम फेरी संगीतमय व कलात्मक होण्याचे संकेत आहेत. शासनाच्या या संगीतमय नाट्यस्पर्धेत ''संगीत आरंभी स्मरितो पाय तुझे'' या नाटकाने पडदा उघडणार आहे. रत्नागिरीत संगीत नाटकाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन रसिक प्रेक्षकांच्या आग्रहास्तव या संपूर्ण स्पर्धेची सीझन तिकीट विक्री होणार आहे. नाट्यप्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासनाच्यावतीने स्पर्धा समन्वयक नंदकिशोर जुवेकर यांनी केले आहे.

रसिकांना मेजवाणी...
संगीत मत्स्यगंधा, सूरसाधक, अवघी विठाई माझी, मत्स्यगंधा, संशयकल्लोळ, ययाती देवयानी, अयोध्येचा ध्वजदंड, नात्यांच गणित, तुका म्हणे आता, मंदारमाला, हे बंध रेशमांचे, एकच प्याला, रणदुदुंभी, ऋणानुबंध, मल्लिका, सौभद्र, तमसो मा ज्योतिर्गमय, त्रिवेणी, डबललाईफ, कट्यार काळजात घुसली, माऊली, मेघमल्हार, स्मशानयोगी, आपुलाची वाद आपणाशी, मत्स्यगंधा आदी दिग्गज लेखकांच्या नाटकांचा समावेश आहे.