
एन. एस. एस. शिबिराचे उद्घाटन
rat०५२७.txt
बातमी क्र..२७ ( पान २ साठी)
rat५p२०.jpg-
७३४२२
रत्नागिरी ः श्रमसंस्कार निवासी शिबिराचे उद्घाटन श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आण्णा सामंत यांच्या उपस्थित झाले. या वेळी अन्य मान्यवर.
--
सामंत महाविद्यालयाच्या एन.एस.एस. शिबिर
रत्नागिरी, ता. ५ ः डी. जे. सामंत महाविद्यालय पालीमधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे श्रमसंस्कार निवासी शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा मठ, कुंभारवाडी येथे झाले. राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटक म्हणून श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आण्णा (रवींद्र) सामंत उपस्थित होते.
या वेळी मठ गावच्या सरपंच वैष्णवी साळवी, उपसरपंच केशव बंडबे, शालेय मुख्याध्यापक नरेश बने, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक बंडबे, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कांता कांबळे, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्यवर्धिनी केंद्र मठचा स्टाफ, ग्रामसेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजन विभागाच्यावतीने प्रथमच या वर्षी दत्तक गाव म्हणून मठ गावची निवड २०२२- २३ या शैक्षणिक वर्षासाठी करण्यात आलेली. ४ ते १० जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरादरम्यान स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान, आपत्ती व्यवस्थापन, शोषखड्डा निर्मिती, जलसंवर्धन जनजागृती, वनसंवर्धन सर्वेक्षण, पायवाट नूतनीकरणसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. सुदीप पवार यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. विनोद भुवड यांनी केले.