
आदर्श शिक्षक पुरस्कार
rat०६१२.txt
( टुडे पान ३)
rat६p४.jpg ः
७३५९८
राजापूर ः आदर्श शिक्षक पुरस्काच्या रक्कमेचा धनादेश राजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते यांच्याकडे सुपूर्द करताना शहाजीराव खानविलकर.
नाखरे गुरूजींच्या नावे आदर्श शिक्षक पुरस्कार
प्राचार्य खानविलकरनी दिले ५० हजार ; आगळी गुरूवंदना
सकाळ वृत्तसेवा ः
राजापूर, ता. ६ ः शाळा आणि गुरूचे ऋण माणसाला कधीही विसरता येत नाहीत; मात्र या ऋणातून उतराई होण्याची धडपड शिष्य अखंडपणे करत राहतो. एकलव्याने गुरूवरील ऋणापोटीच आपला उजवा अंगठा गुरूदक्षिणेच्या रूपात देऊन आपण खरा शिष्य असल्याचे दाखवून दिले होते. तद्वतच तालुक्यातील नूतन विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य शहाजीराव खानविलकर यांनी आपले गुरू आणि कलासक्त शिक्षक (कै.) यशवंत नाखरे गुरूजी यांच्या नावाने आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा केली आहे. ही एकप्रकारे शिष्याने दिलेली ‘गुरूवंदना’च म्हणावी लागेल.
राजापूर पत्रकार संघाच्यावतीने पत्रकारदिनी दरवर्षी दिला जाणारा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार पुढील वर्षीपासून (कै.) यशवंत नाखरे गुरूजी यांच्या नावाने त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणार आहे. या पुरस्कारासाठी रुपये ५० हजाराचा धनादेश शहाजीराव खानविलकर यांनी गुरूवारी पत्रकार संघाकडे सुपूर्द केला. त्यातून दरवर्षी हा पुरस्कार दिला जावा, अशी अपेक्षा खानविलकर यांनी व्यक्त केली आहे. पुढील वर्षीपासून हा पुरस्कार (कै.) नाखरे गुरूजी यांच्या नावाने एका आदर्श शिक्षकाला प्रदान केला जाणार आहे.
खानविलकर यानी सांगितले की, नाखरे गुरूजी हे हाडाचे शिक्षक होते. सानेगुरूजींच्या ममतेने ते विद्यार्थ्यांना शिकवत. ते उत्तम चित्रकार, छायाचित्रकार होतेच; त्यांनी आदर्श विद्यार्थी, आदर्श समाज घडवण्याचे काम केले. त्यांचा परिसस्पर्श आपल्याला लाभला हे आपले सद्भाग्य. त्यांची कायम आठवण राहावी म्हणून त्यांच्या नावाने समाजाला दिशा देण्याचे काम करणाऱ्या पत्रकार संघातर्फे त्यांच्या नावे पुरस्कार द्यावा. खानविलकर यांनीही अनेक विद्यार्थी घडवले. त्यांचे अनेक विद्यार्थी त्यांचा आदर्श घेऊन आपल्या जीवनाची यशस्वी वाटचाल करत आहेत.
आदर्श शिक्षक, शेतकरी, डॉक्टर असे पुरस्कार
राजापूर पत्रकार संघाच्यावतीने पत्रकारदिनी दरवर्षी आदर्श संस्था, आदर्श शिक्षक, आदर्श शेतकरी, आदर्श डॉक्टर असे पुरस्कार दिले जातात. समाजाला प्रेरणा देणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्याचा हेतू या मागे आहे. संघाचे आदर्शवत काम लक्षात घेऊन खानविलकर यांनी आदर्श शिक्षक पुरस्कासाठी पत्रकार संघाला ही कायम ठेव दिली आहे.
---