पत्रकार हा समाजाचा खरा चेहरा ः सुशीलकुमार पावरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्रकार हा समाजाचा खरा चेहरा ः सुशीलकुमार पावरा
पत्रकार हा समाजाचा खरा चेहरा ः सुशीलकुमार पावरा

पत्रकार हा समाजाचा खरा चेहरा ः सुशीलकुमार पावरा

sakal_logo
By

rat०६१८.txt

( टुडे पान ३)

rat६p८.jpg -
73628
दापोली ः येथे पत्रकारदिनी बिरसा फायटर्सतर्फे दर्पणकार जांभेकर यांचे स्मरण करण्यात आले.

वृत्तपत्रांनी जपली विश्वासार्हता

सुशीलकुमार पावरा ;पत्रकार हा समाजाचा खरा चेहरा


हर्णे, ता. ६ ः वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. मराठी वृत्तपत्र आजही वाचक आवडीने वाचतात. वृत्तपत्रांनी आजही आपला समाजाभिमुख चेहरा व विश्वासार्हता जपली आहे. हे काम करणारा पत्रकार समाजाचा खरा चेहरा आहे. वृत्तपत्रे लोकशाहीची मूल्ये जनमानसात रूजवण्याचे काम करत आहेत. वृत्तपत्रांतील छापील शब्दांवर विश्वास ठेवणारी मंडळी आजही आहेत. वृत्तपत्रात जे छापले आहे ते सत्य आहे, पवित्र आहे, अशी दृढ भावना आजही लोकांमध्ये आहे. त्यामुळे देशात माध्यमक्षेत्रात उलथापालथ झाली असली तरी वृत्तपत्रांबद्दल आदर व आब अजूनही लोकांमध्ये कायम आहे,असे प्रतिपादन सुशीलकुमार पावरा यानी केले.
पत्रकार दिनी दापोली येथे बोलताना पावरा म्हणाले, आज मराठी पत्रकार दिन आहे. शासनाने ६ जानेवारी हा दिवस वृत्तपत्राचे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकारदिन म्हणून घोषित केला. जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र ६ जानेवारी १८३२ ला सुरू केले होते. या वृत्तपत्राद्वारे जांभेकर यांनी देशात मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. आजही वृत्तपत्रे ही सर्वसामान्य जनतेच्या समस्या सत्ताधाऱ्यांपर्यंत व प्रशासनापर्यंत पोहचवून समस्या सोडवण्याचे काम करतात. वृत्तपत्रांद्वारे समाजप्रबोधन व समाजजागृतीही केली जात आहे. अनेक वृत्तपत्रांतून वाचकांचे मनोरंजनही केले जात आहे. वृत्तपत्रे ही सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज आहे. वृत्तपत्राचा आवाज हा कधीच दाबला जाऊ शकत नाही. वृत्तपत्रातील बातम्यांच्या परिणामामुळेच माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला अनेक प्रकरणांत न्याय मिळण्यास मदत झाली आहे, अशी प्रतिक्रिया पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी दिली.
-