पत्रकारांनी निर्भीड पत्रकारिता करावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्रकारांनी निर्भीड पत्रकारिता करावी
पत्रकारांनी निर्भीड पत्रकारिता करावी

पत्रकारांनी निर्भीड पत्रकारिता करावी

sakal_logo
By

73698
सावंतवाडी ः बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना प्रभारी तहसीलदार अरुण उंडे. बाजूला पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे-परब आदी.

पत्रकारांनी निर्भीड पत्रकारिता करावी

अरुण उंडे ः सावंतवाडीत जिल्हा प्रेस क्लबतर्फे पत्रकार दिन

सावंतवाडी, ता. ७ ः ब्रिटिश राजवटीला न जुमानता समाज प्रबोधन करणाऱ्या बाळशास्त्री जांभेकरांमुळे खऱ्या अर्थाने पत्रकारतेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी निर्भीड आणि निस्वार्थ भावनेने समाजातील वास्तव मांडले. आजच्या पत्रकारांनीही समाजातील खरे वास्तव मांडून निर्भीड पत्रकारितेतून लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट करावा, असे आवाहन सावंतवाडीचे प्रभारी तहसीलदार अरुण उंडे यांनी केले.
जिल्हा प्रेस क्लबच्यावतीने आज दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी सावंतवाडी पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे, राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे-परब, उपाध्यक्ष अनंत जाधव उपस्थित होते. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस हस्ते पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात झाली. श्री. उंडे म्हणाले, ‘‘पन्नास वर्षांपुर्वी या देशात ब्रिटिशांची जुलमी राजवट सुरु होती. मात्र, त्यांच्या या जुलमी राजवटीच्या विरोधात बाळशास्त्री जांभेकर यांनी आवाज उठवत आपल्या दपर्ण या दैनिकातून समाज प्रबोधनाचे काम केले. त्यांनी सामाजिक परिस्थिती जाणून समाज्यातील अन्यायाविरोधात वाचा फोडण्याचे काम केले. त्यांनी निर्भीड आणि निस्वार्थ भावनेने वास्तव मांडले. आजही लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकाराकडून आपल्या लेखणीतून समाज प्रबोधन होत आहे. ते अधिकाधिक अजून धारधार व्हावे.’’ मेंगडे म्हणाले, ‘‘पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ खऱ्या अर्थाने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी जगासमोर आणला. त्यांनी ब्रिटिश राजवटीमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही जागवली. जांभेकर यांनी जो पायंडा घालून दिला, तो आजही इथला पत्रकारांनी जपला आहे.’’ कार्यक्रमाला जिल्हा प्रेस क्लबचे माजी जिल्हाध्यक्ष हेमंत खानोलकर, सचिव राकेश परब, खजिनदार संदेश पाटील, दिव्या वायंगणकर, रुपेश हिराप, विश्वनाथ नाईक, मदन मुरकर आदी उपस्थित होते.
--
घारे-परब म्हणाल्या, ‘‘इंग्रजांच्या काळात ‘दर्पण’ वृत्तपत्राच्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकरांनी इंग्रजांच्या जुलमी राजवटीला समाजासमोर आणले. एक अभ्यासू व्यक्तिमत्व असलेल्या जांभेकर यांचे मराठी भाषेवरही चांगले प्रभुत्व होते. आज त्यांचाच वारसा पुढे घेऊन समाजातील पत्रकार अन्याय अत्याचारावर वाचा पडत आहेत. चांगला समाज घडवण्याचे काम पत्रकारांच्या हातून घडत आहे. भविष्यात त्यांचे हे काम अधिक वृद्धिंगत होत जावो.’’