साई पालखीचे बांद्यात स्वागत

साई पालखीचे बांद्यात स्वागत

swt६२७.jpg
L७३७००
बांदाः येथे साई पालखीचे स्वागत करताना साईबाबा भक्तसेवा मंडळाचे पदाधिकारी. (छायाचित्र - निलेश मोरजकर)

साई पालखीचे बांद्यात स्वागत
बांदा, ता. ६ः शहरात गोमंत साई सेवक व साईमंदीर सांगोर्डा गोवा आयोजीत गोवा ते क्षेत्र शिर्डी पदयात्रेचे येथील साईमठ व श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या वतीने भक्तीपुर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. ही पदयात्रा काल (ता. ५) पासून सुरू झाली. २० ला श्री क्षेत्र शिर्डी येथे पोहचणार आहे. या पदयात्रेत १५० साईभक्त सहभागी झाले आहेत. या पदयात्रेचे बांद्यात आगमन होताच श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी अध्यक्ष राकेश‌ केसरकर, उपाध्यक्ष रविंद्र मालवणकर, ज्ञानेश्वर‌ केसरकर, दत्तप्रसाद केसरकर, शैलेश केसरकर, साईराज साळगावकर, बंड्या हरमलकर, सुधा साळगावकर, गिरीष महाजन, किशोर सांळगावकर, विजय कासार, दर्शना केसरकर, राजश्री तेंडले, सुशील मोरजकर, ग्रामपंचायत सदस्या श्रेया केसरकर, सतीश नाटेकर, मंगलदास साळगावकर आदी उपस्थित होते.
----------
swt६२८.jpg
73701
कुडाळः बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

सावित्रीबाईंना कुडाळात अभिवादन
कुडाळः येथील बॅरिस्टर नाथ महिला आणि रात्र महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य प्रा. अरुण मर्गज, प्राचार्य परेश धावडे, प्रा. नितीन बांबर्डेकर, प्रा. योगिता शिरसाट, उपप्राचार्य विभा वझे, प्रा. प्रांजना पारकर, प्रा. वैशाली ओटवणेकर, मंदार जोशी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. नितीन बांबर्डेकर यांनी केले.
--------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com