बंद एस. टी. फेऱ्या सुरू होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंद एस. टी. फेऱ्या सुरू होणार
बंद एस. टी. फेऱ्या सुरू होणार

बंद एस. टी. फेऱ्या सुरू होणार

sakal_logo
By

kan66.jpg
L73737
कणकवली : एस.टी. महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक प्रशांत वासकर यांनी आमदार नीतेश राणे यांच्याशी चर्चा केली.

बंद एस. टी. फेऱ्या सुरू होणार
नीतेश राणे यांची माहिती; विभाग नियंत्रक अधिकाऱ्यांशी कणकवलीत चर्चा
कणकवली, ता. ६ : बंद करण्यात आलेल्‍या शालेय मार्गावरील एस. टी. फेऱ्या पुढील दहा दिवसांत पुन्हा सुरू होणार आहेत. तशी ग्‍वाही एस.टी.चे विभागीय व्यवस्थापक श्रीनिवास जोशी आणि विभाग नियंत्रक प्रशांत वासकर यांनी दिली असल्‍याची माहिती आमदार नीतेश राणे यांनी आज दिली.
सिंधुदुर्ग विभागातील अनेक एस. टी. बसेस नादुरूस्त आहेत. तसेच कमी संख्येने एस. टी. बस असल्‍याने अनेक शालेय मार्गावरील एस. टी. फेऱ्या बंद झाल्‍या होत्या. या बसेस सुरू करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार नीतेश राणे यांनी एस. टी. महामंडळाकडे केली होती. त्‍यानुसार एस. टी. चे विभागीय व्यवस्थापक श्रीनिवास जोशी यांनी आमदार नीतेश राणे यांची त्‍यांच्या ओम गणेश निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्‍यांच्यासोबत विभाग नियंत्रक प्रशांत वासकर उपस्थित होते.
यावेळी झालेल्‍या चर्चेत सिंधुदुर्ग बहुतांश एस. टी. फेऱ्या ग्रामीण मार्गावरून धावतात. त्‍या मार्गावर अन्य वाहतुकीची सुविधा नाही. त्‍यामुळे माध्यमिक विद्यालय, तसेच तालुक्‍याच्या ठिकाणी असणाऱ्या महाविद्यालयांत येण्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होते. अनेक विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण थांबविण्याची वेळ आली असल्‍याची माहिती आमदार राणे यांनी एस. टी. अधिकाऱ्यांना दिली.
दरम्‍यान अनेक बसेस टायर आणि स्पेअरपार्ट उपलब्‍ध नसल्‍याने बंद असल्‍याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. यावेळी श्री. राणे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग एस. टी. विभागासाठी जादा बसेस, टायर आणि स्पेअर पार्ट उपलब्‍ध करून देण्याची दिली. तर पुढील दहा दिवसांत बंद असलेल्‍या सर्व मार्गावरील एस. टी. फेऱ्या पूवर्वत होतील. तसे निर्देश एस. टी. अधिकाऱ्यांना देत असल्‍याची माहिती विभागीय व्यवस्थापक श्रीनिवास जोशी यांनी दिली.