गोगटेच्या कुपान एकांकिकेला पुरुषोत्तम करंडकमध्ये पारितोषिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोगटेच्या कुपान एकांकिकेला पुरुषोत्तम करंडकमध्ये पारितोषिक
गोगटेच्या कुपान एकांकिकेला पुरुषोत्तम करंडकमध्ये पारितोषिक

गोगटेच्या कुपान एकांकिकेला पुरुषोत्तम करंडकमध्ये पारितोषिक

sakal_logo
By

rat7p22.jpg-
73847
रत्नागिरी ः राज्यस्तरीय पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत यश मिळवणारा गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या कुपान एकांकिकेचा चमू.
-----------
गोगटेच्या कुपान एकांकिकेला
पुरुषोत्तम करंडकमध्ये पारितोषिक
रत्नागिरी, ता. ७ः पुण्याच्या भरतनाट्य मंदिरात झालेल्या पुरुषोत्तम करंडक महाअंतिम फेरीत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या कुपान एकांकिकेने तृतीय क्रमांकाच्या करंडकाचा मान पटकावला. या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सर्वोत्कृष्ट अभिनय पुरस्कार शुभम गोविलकर याने मिळवला. त्याच्यासोबत आर्या वंडकर, राज माने, साक्षी बने, कौशल मोहिते, साक्षी गोरे, शुभम आंब्रे, विशाल तलार, साई जीरोळे या कलाकारांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.
एकांकिकेची तांत्रिक बाजू स्वराज साळुंखे आणि तेजस साळवी यांनी सांभाळली तर मॅनेजमेंटची बाजू सिमरन शेंबेकर, हर्ष कांबळे व प्रतीक पवार यांनी सांभाळली. संघ व्यवस्थापक म्हणून रसिका नाचणकर, संघाचे मार्गदर्शक म्हणून दिग्दर्शक गणेश राऊत, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. आनंद आंबेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेत रत्नागिरी, कोल्हापूर, जळगाव, नागपूर आणि पुणे केंद्रातील एकूण १६ विजेत्या महाविद्यालयाच्या संघांनी रंगतदार सादरीकरण केले होते. सादर झालेल्या एकांकिकांमधून ४ एकांकिका करंडकाच्या मानासाठी पात्र ठरल्या. यात अनुक्रमे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद, तुळजराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी आणि राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालय, साखराळे यांचा समावेश आहे. पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणुन आयकर विभागाचे आयुक्त (सवलत) अभिनय कुंभार, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ. राजेश पांडे, कलोपासकचे अध्यक्ष अनंत निगोजकर उपस्थित होते.
या यशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, प्र. प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. चित्रा गोस्वामी, डॉ. यास्मिन आवटी, महाविद्यालयाचा विद्यार्थी सचिव व सांस्कृतिक विद्यार्थी प्रतिनिधी यश सुर्वे, नाट्यप्रेमी यांनी टीमचे अभिनंदन केले.