खेड ः  आमदार योगेश कदम यांना यापूर्वी राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला होता

खेड ः आमदार योगेश कदम यांना यापूर्वी राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला होता

rat७p२३.jpg
७३८४८
खेडः येथे पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना रामदास कदम.

योगेश कदमांच्या अपघाताची चौकशी करा
रामदास कदम ;पोलिस गाडी मागे टाकून धडक संशयास्पद
खेड, ता. ७ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला काल रात्री टँकरने ठोकर दिली. हा झालेला अपघात घातपाताचा प्रयत्न असल्याचा संशय बाळासाहेबांची शिवसेना नेते रामदास कदम यांनी शनिवारी (ता. ७) खेड येथे व्यक्त केला आहे. घटनेच्या सखोल चौकशीची आमची मागणी आहे.
आमदार योगेश कदम यांचा शुक्रवारी (ता. ६) रात्री कशेडी घाटात अपघात झाला. या अपघातात ते बचावले आहेत; मात्र या अपघातानंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनी शनिवारी (ता. ७) पत्रकार परिषद घेऊन संशय व्यक्त केला आहे. खेड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, रायगडचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे घटनेच्या सखोल चौकशीची मागणी मी केली आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीच्या पुढे व पाठीमागे पोलिसांचे वाहन असतानाही टँकरने पोलिस गाडीला ओव्हरटेक करून आमदारांच्या गाडीला पाठीमागून ठोकरले कसे? हा सर्व प्रकार संशयास्पद वाटतो. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांच्या माध्यमातून योगेश कदम यांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु दापोली मतदार संघातील जनता आमदार कदम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. त्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला. त्यामुळे हा अपघात म्हणजे त्यांना संपवण्याचा कट तर नाही ना, असा संशय माझ्या मनामध्ये आहे. त्यामुळे या अपघाताची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
या अपघातानंतर टँकरचालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. तो अद्याप फरार असल्याचे समजते. त्यामुळेच हा अपघात नव्हे तर घातपात वाटत आहे, असा संशय रामदास कदम यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या घटनेची कसून चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी पोलिस विभागाला केली आहे. दरम्यान, आमदार योगेश कदम यांनीदेखील माध्यमांशी बोलताना या घटनेची चौकशी झाली पाहिजे, असे नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com