
भगवंताची साधना, उपासना करा
rat०८३०.txt
(टुडे पान तीन साठी)
भगवंताची साधना, उपासना करा ः सकपाळ महाराज
राजापूर, ता. ९ ः सध्याच्या कलियुगामध्ये अन्य साधने लोप पावत असताना परमार्थासाठी भजन, कीर्तन करणे गरजेचे आहे. काळाच्या उडीतून कोणीही सोडवणूक करणार नाही. मात्र इंद्रीय शाबूत असेपर्यंत भगवंताची साधना, उपासना करा, असे प्रतिपादन मुंबई येथील हभप समीर सकपाळ महाराज यांनी केले. शहरानजीकच्या शीळ येथील वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह झाला. त्यामध्ये हभप सकपाळ महाराज यांनी कीर्तन केले. यामध्ये त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी अभंगाच्या माध्यमातून इंद्रियांना केलेला उपदेश याचा विविध उदाहरणांच्या माध्यमातून सविस्तर उलगडा केला. अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केल्याबद्दल शीळ येथील वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळाचे कौतुक केले. वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळातर्फे हभप समीर सकपाळ महाराज यांचा सत्कार करण्यात आला.