आरोग्य सेविकांना न्याय देऊ ः नारायण राणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य सेविकांना न्याय 
देऊ ः नारायण राणे
आरोग्य सेविकांना न्याय देऊ ः नारायण राणे

आरोग्य सेविकांना न्याय देऊ ः नारायण राणे

sakal_logo
By

74256
सिंधुदुर्गनगरी ः येथे सुरु असलेले आंदोलन केंद्रीय मंत्री राणेंच्या आश्वासनानंतर आरोग्यसेविकांनी तूर्त स्थगित केले.


आरोग्य सेविकांना न्याय
देऊ ः नारायण राणे

ठिय्या आंदोलन तूर्त स्थगित

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ९ ः राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य सेवेतून कमी केलेल्या अन्यायग्रस्त आरोग्य सेविकांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एकाही आरोग्य सेविकेवर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन दिल्याने व आमदार नितेश राणे यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधू, असे सांगितल्याने गेले १५ दिवस सुरु असलेले जिल्हा परिषद समोरील ठिय्या आंदोलन तूर्त स्थगित केले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत गेली १२ वर्षे काम करत असलेल्या जिल्ह्यातील १९ आरोग्य सेविकांना शासनाच्या परिपत्रकानुसार ३१ ऑक्टोबर २०२२ पासून कमी केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत आपल्याला पुन्हा सेवेत दाखल करून घ्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील अन्यायग्रस्त आरोग्य सेविकांनी २१ डिसेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू ठेवले होते. आंदोलनाला १५ दिवस झाले तरीही शासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी उद्यापासून (ता.१०) बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. याबाबत आमदार राणे यांनी दखल घेत केंद्रीय मंत्री राणे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी आपण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय व राज्याचे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य न्याय दिला जाईल. जिल्ह्यातील एकही आरोग्य कर्मचाऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन त्यांना दिल्याने आज आंदोलन तूर्त स्थगित केले. यावेळी आरोग्य सेविका अर्चना गंगावणे, संपूर्णा सातार्डेकर, सायली जाधव, श्वेता ठाकूर, सरिता जंगले, पूजा परब, सोनाली मोहिते, अनिता जंगम, अंकिता तेली, आदी आरोग्यसेविका उपस्थित होत्या.