चिपळूण ः पांचाळ समाजाच्या एकजूट परिवर्तन घडवणारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः  पांचाळ समाजाच्या एकजूट परिवर्तन घडवणारी
चिपळूण ः पांचाळ समाजाच्या एकजूट परिवर्तन घडवणारी

चिपळूण ः पांचाळ समाजाच्या एकजूट परिवर्तन घडवणारी

sakal_logo
By

फोटो ओळी
-ratchl९३.jpg ःKOP२३L७४२५९ चिपळूण ः पांचाळ समाजाच्या जिल्हा मेळाव्याला संबोधित करताना खासदार विनायक राऊत.

पांचाळ समाजाची एकजूट परिवर्तन घडवणारी
खासदार राऊत ; चिपळुणातील मेळाव्यात दाखवली ताकद
चिपळूण, ता. ९ ः जोपर्यंत समाजाची एकजूट दिसत नाही, तोपर्यंत त्या समाजाचे प्रश्‍न, समस्या राजकारण्यांना दिसत नाहीत आणि सुटतही नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तुमची संघटित ताकद खूप महत्वाची आहे. या समाजाने अनेक कलागुणसंपन्न लोक घडवले आहेत. पूर्वजांच्या विचारांचा वारसा घेऊन आपण अनेक वर्षानंतर एकसंघ होत आहात की खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. पांचाळ समाजाच्या एकजुटीची ही वज्रमूठ परिवर्तन घडवणारी आहे, असे प्रतिपादन शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केले.
रत्नागिरी जिल्हा पांचाळ सुतार समाज संघ या संघटनेच्या रौप्य महोत्सवानिमित्त रविवारी शहरातील उक्ताड येथील (कै.) सदाशिवराव गोपाळ भोसले क्रीडांगण येथे जिल्हा मेळावा झाला. मेळाव्याची सुरवात विश्‍वकर्मा पूजनाने झाली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष वासुअप्पा मेस्त्री होते.
आमदार भास्कर जाधव यांनी इतिहासाचे अनेक दाखले देत त्यांनी समाजाला यापुढेही संघटित राहण्याचे आवाहन केले. संघटित झाल्यास प्रश्‍न सुटतात. त्यामुळे संघटित होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
आमदार शेखर निकम म्हणाले,‘ २५ ते ३० वर्षानंतर समाजाने घेतलेला हा भव्य मेळावा समाजासाठी वेगळी शिकवण देणारा ठरणार आहे. संघटित होणं काळाची गरज आहे. विश्‍व निर्माण करणाऱ्यांचे तुम्ही शिष्य आहात, त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. समाज आज चांगल्याप्रकारे प्रगती करतोय. या मेळाव्यातून समाजाला नक्कीच नवी दिशा सापडणार आहे. आपले जे काही प्रश्‍न, समस्या आणि मागण्या असतील त्या राज्यशासनाकडे मांडून सोडवण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
माजी आमदार रमेश कदम म्हणाले, ‘शहरातून काढलेली शोभायात्रा आणि आजचा मेळावा यातून पांचाळ समाजाने आपली एकजूट दाखवली आहे. समाजाच्या वास्तूसाठी जागेचा शोध सुरू आहे. येत्या काही वर्षात समाजाची एक भव्यदिव्य वास्तू उभी राहील त्यासाठी प्रयत्न करू.’
माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी हा मेळावा पुढच्या पिढीला प्रेरणा देणारा ठरेल. असे सांगितले. रत्नागिरी जिल्हा पांचाळ सुतार समाजसंघातर्फे लोकप्रतिनिधींना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी समाजभूषण, विविध पुरस्काराचे वितरण, स्मरणिका प्रकाशन, व्याख्याने, कलादालनाचे उद्घाटन, विद्यार्थी गुणगौरव, लकी ड्रॉ सोडत व बक्षीस वितरण आदी कार्यक्रम झाले. मेळाव्याला जयंद्रथ खताते, प्रा. नागोजीराव पांचाळ, मच्छिंद्रनाथ चारी, कृष्णकुमार काणेकर, मिलिंद कापडी, सचिन कदम, विनोद झगडे, उमेश सकपाळ, भाऊ काणेकर, धनश्री शिंदे, वसंत सुतार, चंद्रकांत खोपडकर, धामापूरकर, विलास गुहागरकर, पंढरीनाथ देवकर, तुकाराम सुतार, राजेश देवगरकर आदी उपस्थित होते.