Wed, Feb 8, 2023

मारहाण प्रकरणी सात जणांना कोठडी
मारहाण प्रकरणी सात जणांना कोठडी
Published on : 9 January 2023, 3:22 am
मारहाण प्रकरणी सात जणांना कोठडी
सावतंवाडी ः तालुक्यातील एका मुख्याध्यापकास मारहाण केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असलेल्या सातही जणांना आज अटक करून जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश देण्यात आले.
तालुक्यातील एका शाळेत मारहाणीचा प्रकार घडला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके यांनी या गुन्ह्याचा तपास केला. यातील सर्व सात संशयितांना अटक करून जिल्हा न्यायालयात आज हजर करण्यात आले. दरम्यान, संशयितांच्या कुटुंबियांनी जामीनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज सादर केला आहे. उद्या (ता.१०) त्यावर सुनावणी होणार आहे.