परीक्षा वेळापत्रक संकेतस्थळावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परीक्षा वेळापत्रक
संकेतस्थळावर
परीक्षा वेळापत्रक संकेतस्थळावर

परीक्षा वेळापत्रक संकेतस्थळावर

sakal_logo
By

परीक्षा वेळापत्रक
संकेतस्थळावर
कणकवली ः महाराष्ट्रात एमएचटी- सीईटी २०२३ च्या परीक्षा तारखा जाहीर केल्या आहेत. ९ मे पासून परीक्षेला सुरुवात होत आहे. महाराष्ट्राच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्थळावर आहे. त्यानुसार १३ मे पर्यंत ‘पीसीएम’ ग्रुपच्या परीक्षा होतील. ‘पीसीबी’ ग्रुपच्या परीक्षा १५ ते २० मे दरम्यान होणार आहेत. एलएलबीसाठी असलेली एमएचटी- सीईटी परीक्षा १ एप्रिलला होत आहेत. तर अभियांत्रीकी, कृषी आणि बी फार्मसीसाठी वेगवेगळ्या तारखा दिल्या आहेत.
----
कणकवलीत
क्रिकेट स्पर्धा
कणकवली ः शहर काँग्रेसतर्फे २० ते २२ जानेवारी दरम्यान शहर मर्यादित राहुल चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. शहरातील विद्यामंदिर हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा होणार असून विजेत्या संघाला १० हजार, उपविजेत्याला ७ हजार रुपये पारितोषिक आणि चषक देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर अशा वैयक्तिक स्वरूपाची पारितोषिक देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी राजू वर्णे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शहराध्यक्ष अजय मोर्ये यांनी केले आहे.
-----
तळेरेत २१ ला
कबड्डी स्पर्धा
तळेरे : श्री शेवरादेवी क्रीडा मंडळातर्फे तळेरे-वाघाचीवाडी येथे २१ ला जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धा दुपारी तीनला सुरू होणार आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून विजेत्या संघाला रोख रुपये ११,१११ व चषक, उपविजेत्या संघाला रोख ७,७७७ रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तृतीय व चतुर्थ विजेत्या संघाला प्रत्येकी रोख रुपये २,५५५ रुपये व चषक तसेच तर इतर वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
--
दिगवळे येथे
क्रिकेट स्पर्धा
कनेडी ः दिगवळे येथील स्वयंभू स्पोर्टस् तर्फे १४ आणि १५ जानेवारीला खुल्या नाईट हँड लॅक बॉक्स अंडरग्राउंड क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे सात हजार २३ रुपये व चषक, ५ हजार २३ रूपये आणि चषक देण्यात येणार आहे. तसेच वैयक्तिक स्वरूपाची पारितोषिक देण्यात येणार आहेत.
----
फोंडाघाट येथे
थंडीची लाट
फोंडाघाट ः येथील परिसरात गेले दोन दिवस थंडीची लाट आली आहे. परिसरात कमाल तापमाण घटले आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आंबा, काजू पिकाला फायदा होणार आहे. थंडीमुळे लोकरीच्या कपड्यांची मागणी वाढली आहे.