
प्रा. डॉ. संदीप सांगळे सदस्यपदी
74558
प्रा. डॉ.संदीप सांगळे
प्रा. डॉ. संदीप सांगळे सदस्यपदी
कणकवली : पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळावर प्रा. डॉ. संदीप विठ्ठलराव सांगळे यांची बहुमताने निवड झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यासमंडळ सदस्यपदासाठी रविवारी (ता.९) मतदान झाले. आज झालेल्या मतमोजणीत प्रा. डॉ. संदीप सांगळे हे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील तिन्ही जिल्ह्यातून सर्वाधिक ५७ मते मिळवून विजयी झाले. या निवडीमुळे प्रा. डॉ. सांगळे यांना ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत सदस्यपदी कार्यरत राहता येणार असून मराठी अभ्यासमंडळाच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधीही मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रा. डॉ. सांगळे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत साहेबराव शंकरराव ढमढेरे आर्टस अँड कॉमर्स कॉलेज तळेगाव ढमढेरे येथे प्राध्यापकपदी कार्यरत आहेत.