खेड ः रिसॉर्ट नेमकं कोणाचं धक्कादायक वास्तव जनतेसमोर
साई रिसॉर्ट उद्योजक सदानंद कदम यांचे
माजी आमदार संजय कदम ; अनिल परबाविरोधात अकारण वातावरण
खेड, ता.१०ः गेल्या तीन वर्षापासून वादात सापडलेले साई रिसॉर्ट उद्योजक सदानंद कदम यांचे आहे, अशी माहिती माजी आमदार संजय कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. सदानंद कदम हे रामदास कदम यांचे धाकटे बंधू आहेत.
पत्रकारांशी बोलताना संजय कदम म्हणाले, ‘अनिल परब यांनी सुरवातीपासून साई रिसॉर्ट प्रकरणी आपला काहीही संबंध नाही. हे वारंवार सांगितलेले असताना हे साई रिसॉर्ट नेमकं कोणाचं? हा सर्वसामान्य पडणारा प्रश्न होता. उद्योजक सदानंद कदम यांच्या मालकीचे असताना अनिल परब यांच्या विरोधात वातावरण निर्माण केले जात आहे.
सदानंद कदम यांनी आपल्या उद्योगाच्या जोरावर कष्टाने कमावलेल्या पैशातून हे साई रिसॉर्ट दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी बांधले आहे. कोकणातील आणि मुंबईतील बेरोजगार तरुणांना रोजगार निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून आणि पर्यटनवाढीच्या दृष्टिकोनातून उद्योजक सदानंद कदम यांनी रिसॉर्ट बांधले आहे.
रामदास कदम यांनी आपल्या सख्ख्या भावालाच नाही तर दापोली विधानसभा मतदार संघातील समुद्रकिनारी असलेल्या शेकडो रिसॉर्ट चालक-मालक आणि शेकडो कुटुंब चालणाऱ्या कामगारांच्या रोजगारावर कुऱ्हाड मारली आहे. रामदास कदम यांनी दापोली तालुक्यातीलच नव्हे तर कोकणातील पर्यटन संपवण्यासाठी विडा उचलला असल्याचा आरोप संजय कदम यांनी यावेळी केला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.