ओरोस येथे रविवारी विधी संचालन शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओरोस येथे रविवारी 
विधी संचालन शिबिर
ओरोस येथे रविवारी विधी संचालन शिबिर

ओरोस येथे रविवारी विधी संचालन शिबिर

sakal_logo
By

ओरोस येथे रविवारी
विधी संचालन शिबिर
कुडाळ, ता. ११ ः दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा सिंधुदुर्ग अंतर्गत संस्कार विभागातर्फे एक दिवशीय राज्यस्तरीय विधी संचालन मार्गदर्शन शिबिर रविवारी (ता.१५) सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतपेढी सभागृह (रवळनाथनगर) ओरोस येथे आयोजित केले आहे.
शिबिराच्या पहिल्या सत्रात सकाळी १० ते १ पर्यंत दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन विद्याधर कदम, रविकांत जाधव यांचे हस्ते करण्यात येणार आहे. शिबिराचे उद्‍घाटन सीताराम सोनवडेकर यांच्या हस्ते होणार आहे. विधी संचालकाचे मातृसंस्थेप्रती कर्तव्य व जबाबदारी, व्यक्तिगत आचारसंहिता, विधी संचालनाची विधी संबंधी आचारसंहिताबाबत याबाबत रविकांत जाधव (संस्कार प्रमुख, महाराष्ट्र राज्य) हे मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी १ ते २ या वेळेत भोजन, दुसऱ्या सत्रात दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत परिसंवाद उजळणी, शिबिरार्थी मनोगत, विधी संचालक प्रमाणपत्र वाटप, जिल्हाध्यक्ष विद्याधर कदम यांचे अध्यक्षीय भाषण, विषय विधी संचालकाचे मातृसंस्थेप्रती कर्तव्य व जबाबदारी, व्यक्तिगत आचारसंहिता, विधी संचालनाची विधी संबंधी आचारसंहिताबाबत रविकांत जाधव यांचे मार्गदर्शन होणार आहे. अधिक माहितीसाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.