विज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात हवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात हवा
विज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात हवा

विज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात हवा

sakal_logo
By

74800
सावंतवाडी ः तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविताना मान्यवर.

जीवनात विज्ञानाचा वापर आवश्यक

शिक्षणाधिकारी महेश धोत्रे ः सावंतवाडीत शालेय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ ः विज्ञानाची सकारात्मक बाजू आपण समजून घेऊन विज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी येथे केले.
येथे आयोजित ५० व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा बक्षीस वितरण आणि समारोपाचा कार्यक्रम काल (ता. १०) मिलाग्रीस प्रशालेच्या भव्य सभागृहात झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे शिक्षणाधिकारी धोत्रे यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी विज्ञान प्रदर्शनातील विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, उपशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर, सावंतवाडी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, केंद्रप्रमुख स्नेहा लंगवे, मिलाग्रीस हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा, उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका मेघना राऊळ आदी उपस्थित होते. अरुण सुतार, कल्पना बोडके, मुख्याध्यापक सालदान्हा यांनी मनोगते सादर केली. शिक्षणाधिकारी धोत्रे यांचे स्वागत सावंतवाडी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी केले. शिक्षणाधिकारी धोत्रे यांनी विज्ञान प्रदर्शनाच्या नियोजनबध्द आयोजनाबद्दल मॅनेजमेंट, चेअरमन बिशप आल्विन बरेटो, मुख्याध्यापक सालदान्हा, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून आभार मानले. प्रशालेचे सहशिक्षक शारदा गावडे यांनी सूत्रसंचालन केले. दत्ताराम नाईक यांनी आभार मानले.
---
प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांचे सहकार्य
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी विज्ञान प्रतिकती, अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य, प्रयोगशाळा परिचर-सहाय्यक प्रतिकती, निबंध स्पर्धा, वक्तत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. विज्ञान प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, प्रशालेने नेमलेले स्वयंसेवक-विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.