25 वर्षे विनाअपघात सेवेबद्दल राजन कीर यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

25 वर्षे विनाअपघात सेवेबद्दल राजन कीर यांचा सत्कार
25 वर्षे विनाअपघात सेवेबद्दल राजन कीर यांचा सत्कार

25 वर्षे विनाअपघात सेवेबद्दल राजन कीर यांचा सत्कार

sakal_logo
By

rat११३३.txt

(पान ५ साठी, अॅंकर)

फोटो ओळी
-rat११p३३.jpg ः
७४८२१
राजन कीर
--
एसटी चालक कीर यांची २५ वर्षे विनाअपघात सेवा

सडक सुरक्षा अभियान ; देवरूख आगारात सत्कार

सकाळ वृत्तसेवा ः
साखरपा, ता. १२ ः देवरूख एसटी आगाराचे चालक राजन कीर यांनी सलग २५ वर्षे विनाअपघात सेवा दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सडक सुरक्षा अभियानाअंतर्गत त्यांच्या सेवेची दखल खात्याकडून घेण्यात आली आहे.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सडक सुरक्षा जीवनरक्षा सुरक्षितता अभियान सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर साखरपा बाजारपेठ येथे राहणारे देवरूख डेपोमध्ये कार्यरत असणारे राजेंद्र कृष्णा कीर यांना परिवहनखात्यात सलग २५ वर्षे विनाअपघात सेवा बजावल्याबद्दल गौरवण्यात आले. देवरूख एसटी डेपो येथे हा गौरव सोहळा झाला.
एसटी खात्यात १९९६ ला लांजा डेपो येथून कीर यांनी सेवेला प्रारंभ केला होता. तेव्हापासून दर पाच वर्षांनी त्यांना विनाअपघात सेवेबद्दल गौरवण्यात येत आहे. या वेळी त्यांनी सुरवातीच्या वेळच्या गुरू सुरेंद्र माने यांचे आभार मानले. त्यांनी त्या काळात केलेलं मार्गदर्शन आपणाला मोलाचं ठरल्याचं सांगितले. सध्या असलेले डेपो व्यवस्थापक पाथरे यांचीदेखील उत्तम साथ लाभत असल्याचे सांगितले. त्यांची अजून दोन वर्ष सेवेतील बाकी आहेत. त्यातदेखील आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने उत्तम सेवा बजावणार, असे सांगितले. जे सध्याचे नवोदित चालक आहेत त्यांना मोलाचा सल्ला दिला की, वळणावर वाहने येतच असतात. मनाचा ब्रेक हा कायम उत्तम असतो तसेच आपण गाडी चालवत असताना आपल्या मागे बसलेले आपले कुटुंब आहे असे समजून वाहन चालवणे आवश्यक आहे.

सामाजिक कार्यातही अग्रेसर...
एसटीमधील सेवेसोबत राजेंद्र कीर हे सामाजिक सेवेतसुद्धा अग्रेसर असतात. त्यांनी एसटी स्थानकाची साफसफाई, प्रवाशांसाठी पाणपोई, स्थानकाजवळ असणारे साईमंदिर लोकसहभागातून डागडुजी यासाठी मेहनत घेतली आहे.