दापोलीत निचांकी तापमानामुळे हुडहुडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दापोलीत निचांकी तापमानामुळे हुडहुडी
दापोलीत निचांकी तापमानामुळे हुडहुडी

दापोलीत निचांकी तापमानामुळे हुडहुडी

sakal_logo
By

दापोलीत निचांकी तापमानामुळे हुडहुडी
दाभोळः दापोली येथे सलग दुसऱ्या दिवशी निचांकी तापमान नोंदवले गेल्याने दापोलीकरांना कडाक्याची थंडी अनुभवायला मिळत आहे. मंगळवारी (ता. १०) सकाळी ५.३० वाजेपर्यंत दापोलीजवळील गिम्हवणे येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषीविद्या विभागात असलेल्या हवामानशास्त्र विभागात किमान १०.२ अंश सेल्सियसइतके तापमान नोंदवले गेले होते. बुधवारी (ता. १०) हे तापमान १० पर्यंत घसरले. त्यामुळे दिवसभर थंडी वाजत असून सायंकाळनंतर त्यामध्ये वाढ होत असल्याने अनेकजण कामे उरकून घर गाठताना दिसत आहेत. आज सकाळी ५.३० वाजेपर्यंत निचांकी असे १० अंश सेल्सियसइतके तापमान नोंदले गेल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली. आज सकाळीही थंडीचा कडाका जाणवत असल्याने सकाळी फिरावयास बाहेर पडणाऱ्या अनेकांनी दांडी मारल्याचे दिसले. आज दुपारीही थंडीचा प्रादुर्भाव जाणवत होता. अशीच थंडी काही दिवस पडली तर त्याचा फायदा आंबा बागायतदारांना होणार आहे.
-------
सालपेत स्ट्रीटलाईटचे उदघाटन
लांजाः सालपे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य संकेत घाग यांनी अवघ्या २० दिवसात स्वखर्चातून वाडीत तसेच रस्त्यावर स्ट्रीटलाईट बसून वचनपूर्ती केली आहे. या स्ट्रीटलाईटचा उद्घाटन सोहळा झाला. ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलो तर गावांतील विविध विकासकामे मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी निवडणुकीत मतदारांना दिले होते. त्यानुसार ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर घाग यांनी वॉर्ड क्र. तीनमध्ये तसेच रस्त्यावर प्रत्येक वाडीत स्वखर्चातून स्ट्रीटलाईट बसवून आपली वचनपूर्ती केली आहे. घाग यांच्याकडून सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर लगेचच २० दिवसांत वॉर्ड नं. ३ मध्ये स्वखर्चाने प्रत्येक वाडीत आणि रस्त्यावर स्ट्रीटलाईट लावण्यात आले.
-----------------