रुग्ण आणि वैद्याचे नाते वर्षानुवर्ष टिकावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्ण आणि वैद्याचे नाते वर्षानुवर्ष टिकावे
रुग्ण आणि वैद्याचे नाते वर्षानुवर्ष टिकावे

रुग्ण आणि वैद्याचे नाते वर्षानुवर्ष टिकावे

sakal_logo
By

rat११२०.txt

बातमी क्र..२० (पान ५ साठी)

फोटो ओळी
-rat११p३५.jpg ः
७४८४०
शृंगारतळी ः फित कापून रुग्णालयाचे उद्‌घाटन करताना पराग सावंत देसाई, डॉ. विनय नातू आदी मान्यवर.
---
रुग्ण, वैद्याचे नाते वर्षानुवर्ष टिकावे

डॉ. विनय नातू ; शृंगारतळीत प्रोलाईफ हॉस्पिटलचे उद्‌घाटन

गुहागर, ता. १२ ः रुग्ण आणि वैद्य यांच नातंसुद्धा वर्षानुवर्ष टिकले पाहिजे तरच या रुग्णसेवेतील चांगल्या गोष्टी आणि घटना पुढच्या काळात सांगता येतील, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केले. ते प्रोलाईफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्‌घाटनसमयी बोलत होते. गुहागर तालुक्यातील पहिल्या अत्याधुनिक रुग्णालयाचे उद्‌घाटन बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक पराग सावंत देसाई यांनी केले.
माजी आमदार डॉ. विनय नातू म्हणाले, गुहागरमध्ये रुग्णालय नाही याची सर्वाधिक जाणीव कोविडच्या काळात झाली. ३५ वर्षांपूर्वी तात्या व माईंच्या इच्छेचा मान राखून एम. एस. झालेल्या डॉ. विवेक नातूंनी घोणसरे येथे रुग्णालय उभे केले. त्यानंतर नव्या पिढीला सर्जन गुहागर तालुक्यात येण्यासाठी ३५ वर्षांचा काळ लोटला. आज याच गावातील एक तरुण पुन्हा एकदा गुहागरवासीयांना रुग्णसेवा देण्यासाठी शृंगारतळीत रुग्णालय उभे करत आहे, ही कौतुकाची बाब आहे.
पराग सावंतदेसाई म्हणाले, डॉ. सचिन त्याची पत्नी डॉ. अश्विनी वैद्यकिय क्षेत्रात उच्च विद्याविभुषित होऊन पुन्हा गुहागरमध्ये आल्या, याचा आम्हाला अभिमान आहे. डॉ. सचिन ओक म्हणाले, कितीही शिक्षण घेतले तरी गुहागरमध्येच सुसज्ज रुग्णालय उभे करायचे हे आधीपासूनच मी ठरवले होते. यावेळी उद्योजक मोहन संसारे, शाळीग्राम खातू, राजन दळी, रघुशेठ ओक, शोएब मालाणी, सुरेंद्र मर्दा, अरुण परचुरे, यशवंत बर्वे, अरुण गांधी, डॉ. राजेंद्र पवार, डॉ. अनिकेत गोळे, डॉ. मंदार आठवले, अरुण ओक, लक्ष्मण शिगवण, माजी सरपंच संजय पवार आदी उपस्थित होते.