Wed, Feb 8, 2023

कड्यावरच्या गणपती मंदिरात भाविकांची गर्दी
कड्यावरच्या गणपती मंदिरात भाविकांची गर्दी
Published on : 11 January 2023, 1:39 am
rat11p34.jpg
74839
आंजर्लेः कड्यावरचा गणपती.
-------------
कड्यावरच्या गणपती
मंदिरात भाविकांची गर्दी
दाभोळः अंगारकी चतुर्थीनिमित्त आंजर्ले येथील सुप्रसिद्ध कड्यावरच्या गणपती मंदिरात दापोली तालुक्यातील भाविकांसह अनेक ठिकाणावरून गणेशभक्तांनी येथे येऊन श्रींचे दर्शन घेतले. या वेळी बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली. श्रींच्या दर्शनासाठी मंदिरात अगदी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. दापोली बसस्थानकातून कड्यावरचा गणपती मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी एसटीची सुविधा भाविकांना उपलब्ध करून देण्यात आल्याने ज्यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही अशा भाविकांना गणेशाचे दर्शन घेण्यासाठी जाता आले. प्रत्येक चतुर्थीला अशीच सुविधा एसटी प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाविकांकडून करण्यात आली आहे.