रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त
रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

sakal_logo
By

थिबापॅलेसला १५ ला पतंग महोत्सव

रत्नागिरी ः शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथेली पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या पोदार प्रेप या शाळेतर्फे शहरातील थिबा पॅलेस येथे १५ जानेवारीला मकरसंक्रातीचा सण आणि पतंग महोत्सव सकाळी सात ते साडेनऊ या वेळेत साजरा करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या प्रांतात मकरसंक्रांत सण पंतग महोत्सवाने साजरा करण्यात येतो. तसाच ते रत्नागिरीतील पतंगप्रेमींनी संक्रांत व पतंग महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे. या महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी पतंग खेळण्यासाठी स्वतःचे साहित्य घेऊन यावे या महात्सवाला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


कोकणकन्या २० पासून ''सुपरफास्ट'' धावणार
खेड ः कोकण रेल्वेमार्गावर नियमितपणे विद्युतशक्तीवर धावणारी कोकणकन्या एक्स्प्रेस २० जानेवारीपासून एक्स्प्रेसऐवजी ''सुपरफास्ट'' धावणार आहे. यामुळे प्रवासात २ तास १० मिनिटांच्या वेळेच्या बचतीसह प्रवासही आरामदायी होणार आहे. कोकण मार्गावर दररोज धावणारी कोकणकन्या एक्स्प्रेस नेहमीच हाऊसफुल धावते. या एक्स्प्रेसमध्ये रेल्वे प्रशासनाने नवा बदल केल्याने वेगवान होणार आहे. आतापर्यंत कोकणकन्या एक्स्प्रेस १०१११/१०११२ क्रमांकासह धावत होती. यापुढे कोकणकन्या एक्स्प्रेस २०१११/२०११२ क्रमांकासह धावेल. सीएसएमटी मुंबई-मडगाव सुपरफास्ट कोकणकन्या एक्स्प्रेस सीएसएमटी स्थानकातून रात्री ११.०५ वा. सुटून सकाळी ९.४६ वा. मडगावला पोहचेल. यापूर्वी कोकणकन्या एक्स्प्रेस दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी मडगावला पोहचत होती. नव्या बदलानुसार २ तास १० मिनिटे वेळेची बचत होणार आहे.


शिवखुर्दमध्ये २५ ला माघी गणेशोत्सव
खेड ः शिवखुर्द येथील श्री सिद्धीविनायक मित्रमंडळाच्यावतीने २५ जानेवारीला माघी गणेश जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त विविधांगी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी ८ ते १०.३० या वेळेत पालखी मिरवणूक, ११ वा. सत्यनारायणाची महापूजा, सकाळी १२.३० वा. हळदीकुंकू, लहान मुलांच्या स्पर्धा, दुपारी ३ वा. क्रिकेटचे सामने, सायंकाळी ७ वा. नरळकरवाडी येथील श्री हनुमान भजनी मंडळाचे तर रात्री ९ वा. सत्कार व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अनंत इप्ते सत्कारमूर्ती आहेत. रात्री १० वा. मुंबई येथील श्री साईश्रद्धा प्रस्तुत बहुरंगी वगनाट्य, नमनाचा कार्यक्रम होणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष धोंडू शिंदे, उपाध्यक्ष अनिल भेकरे यांनी कळवले आहे.