केळजी, परब यांचा वेंगुर्लेत सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केळजी, परब यांचा वेंगुर्लेत सत्कार
केळजी, परब यांचा वेंगुर्लेत सत्कार

केळजी, परब यांचा वेंगुर्लेत सत्कार

sakal_logo
By

75260
सिंधुदुर्गनगरी ः येथे हिंदी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाबूराव पराडकर यांना अभिवादन करण्यात आले.

बाबूराव पराडकर यांना
सिंधुदुर्गनगरीत अभिवादन
सिंधुदुर्गनगरी ः हिंदी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाबूराव पराडकर यांच्या पराड येथील जन्मगावी त्यांचे स्मारक उभे राहावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ, मुख्यालय पत्रकार समिती आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने येथील पत्रकार कक्षात पराडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रतिमेला जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, उपाध्यक्ष बाळ खडपकर, मुख्यालय पत्रकार समिती अध्यक्ष संजय वालावलकर, सचिव मनोज वारंग, माहिती सहाय्यक रणजित पवार, रवी गावडे, नंदकुमार आयरे, सतीश हरमलकर, दत्तप्रसाद वालावलकर विनोद दळवी, आदी उपस्थित होते. जिल्हा माहिती अधिकारी सातपुते यांनी यावेळी मत व्यक्त केले.
------------
७५०६८
वेंगुर्ले ः ज्ञानेश्वर केळजी व प्रज्ञा परब यांच्या अभिनंदनप्रसंगी उपस्थित मान्यवर.

केळजी, परब यांचा वेंगुर्लेत सत्कार
वेंगुर्ले ः तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी मातोंड येथील ज्ञानेश्वर केळजी व व्हाईस चेअरमनपदी महिला काथ्याच्या प्रज्ञा परब यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी त्यांचे अभिनंदन केले. सहकारी संस्था सहाय्यक निबंधक उर्मिला जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत ही निवड जाहीर करण्यात आली. यावेळी संचालक चित्रा कनयाळकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल, समीर कुडाळकर, कमलेश गावडे, विष्णु फणसेकर, दत्तात्रय वजराठकर, गुरुनाथ मडवळ, प्रकाश गडेकर, यशवंत परब, विजय रेडकर, महादेव गावडे, सुजाता देसाई, गणेश गोसावी, जनार्दन कुडाळकर, महेश परुळेकर आदी उपस्थित होते.
---
75097
तुळस ः शेतकरी नृत्यात विजेता टोपीवाला प्राथमिक शाळेचा संघ.

समूहनृत्यात टोपीवाला शाळा प्रथम
मालवण : तुळस येथील वेताळ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय समूहनृत्य स्पर्धेत येथील टोपीवाला प्राथमिक शाळेच्या शेतकरी नृत्यास प्रथम क्रमांक मिळाला. स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात टोपीवाला प्राथमिक शाळेने सादर केलेल्या शेतकरी नृत्यास प्रथम क्रमांक मिळाला. यात आर्या फोंडेकर, ओजस्वी साळुंके, काव्या पांगे, देवयानी कुलकर्णी, हर्षिता मिटकर, समृद्धी गोवेकर, समीक्षा तोतरे, आयुषा वेंगुर्लेकर, समृद्धी चव्हाण, निर्भया जाधव, कीर्तेश बटाव, गौरेश घाडीगावकर, अलोक धुरत, मिहिर मायबा यांचा सहभाग होता. सर्व पालक, प्रशालेचे कलाशिक्षक बी. जी. सामंत, सदा चुरी यांचे सहकार्य लाभले. प्रशालेच्या आणि संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका वीणा गोसावी, सुधीर गोसावी, नृत्यदिग्दर्शक कृष्णा तळाशिलकर आदी उपस्थित होते.
---
७५०६५
दत्ता तपसे

राज्याध्यक्षपदी दत्ता तपसे
नांदगाव ः महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने पुढाकार घेत राज्यातील डॉक्टरांसाठी कास्ट्राईब राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघ या संलग्न शाखेची निर्मिती केली आहे. या संघाच्या राज्याध्यक्ष पदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता तपसे यांची निवड झाली. कार्याध्यक्षपदी उपजिल्हा रुग्णालय कळंब (जि.उस्मानाबाद) येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश भालेराव यांची नियुक्ती केली आहे. या कार्यकारीणीत डॉ. चंद्रकात लामतुरे यांची ज्येष्ठ उपाध्यक्षपदी, डॉ. प्रणाली गोपनारायण यांची कोषाध्यक्षपदी, डॉ. धनराज गित्ते यांची सचिवपदी तर डॉ. बालाजी आदमपुरकर यांची संघटकपदी नियुक्ती झाली. या संघाच्या माध्यमातून डॉक्टरांना येणाऱ्या अडचणी समजावून घेत त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडुन ते सोडवण्याची भूमिका घेतली जाणार आहे. लवकरच मध्यवर्ती ठिकाणी या सर्व संघातील सर्व पदाधिकारी व सभासदांचा मेळावा आयोजित करून या संघाची दिशा निश्चित केली जाईल, अशीही माहिती महासंघाने दिली. निवडअंती आपल्यावर टाकलेला विश्वास नेहमीच सामाजिक बांधिलकीतून काम करून पार पडणार असल्याचे डॉ. तपसे यांनी सांगितले.
--
बुद्धिबळ स्पर्धेचे १७ ला उद्‍घाटन
सिंधुदुर्गनगरी ः राज्यस्तरीय शालेय बुध्दीबळ क्रीडा स्पर्धेचे उद्‍घाटन १७ ला सायंकाळी चारला मामाचो गाव रिसॉर्ट हिर्लोक येथे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली. यावेळी प्रमुख उपस्थितीत जिल्हा प्ररिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, कोल्हापूर विभागाचे क्रीडा व युवकसेवा उपसंचालक संजय सबनीस, कुडाळ तहसिलदार अमोल पाठक, मामाचो गाव रिसॉर्ट हिर्लोकचे संचालक अनंत सावंत हे उपस्थित राहणार आहेत. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्याद्वारे १४ वर्षाखालील मुले व मुली यांच्यासाठी आयोजित केले आहे.