
बळ देताहेत छत्रपतींच्या देखण्या मूर्ती
rat१२२४.txt
( पान २ साठी, अॅंकर)
फोटो ओळी
-rat१२p१३.jpg ः
७५०१८
खेड ः भरणेनाका येथील आठवडा बाजारात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकर्षक प्रतिमा.
-------------
खेडमध्ये शिवाजी महाराजांच्या प्रतिमांना मागणी
पुण्यातील तरुणाकडून आकर्षक मूर्तींची निर्मिती, भरणेमध्ये होतेय विक्री
खेड, ता. १२ ः छत्रपती शिवाजी महाराज सर्वांची प्रेरणा आहेत. त्यांची प्रतिमा आपल्या घरी हवी. असे अनेकांना वाटत असते. येथील भरणे नाका येथे पुणे येथील एक तरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकर्षक मूर्ती बनवून विक्रीस ठेवल्या आहेत. त्यावर त्याचा उदरनिर्वाह होतो. भरणेनाका येथील आठवडा बाजारानजीक त्याने व्यवसाय मांडला आहे आहे.
मूळचा राजस्थान व सध्या पुणे येथील स्थायिक असलेल्या सुरेश याने पुणे येथील कारखान्यात हाताने तयार केलेल्या शिवाजी महाराजांच्या मूर्ती आणून विकण्यास सुरवात केली आहे. छत्रपतींच्या विविध आकारात असलेल्या प्रतिमा पाहून अनेक शिवप्रेमींची पावले या मूर्ती विक्रेत्याच्या रस्त्यावरच थाटलेल्या दुकानाभोवती रेंगाळताना दिसून येतात. अनेक मूर्ती हातोहात विकल्या गेले असल्याचे सुरेश यांने अभिमानाने
सांगितले.
पुणे येथे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनवलेल्या मूर्ती तो भरणेनाका येथे आणून विकत आहे. यात छत्रपतींची विविध रूपे छोटेखानी थाटलेल्या दुकानात पाहावयास मिळतात. या मूर्तीमध्ये हातात भवानी तलवार घेतलेली प्रतिमा, बैठी प्रतिमा तर लहान आकाराची मूर्तीदेखील विक्रीला उपलब्ध आहेत. मी राजस्थानचा असलो तरी एक कलाकार म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मला साकारायला मिळते त्याचा आनंद वाटतो व ती मूर्ती शिवप्रेमींच्या घरात मानाने विराजमान होत आहे. यातच माझे समाधान असल्याचे सुरेश हा अभिमानाने सांगतो.
या मूर्तींसोबत राधाकृष्ण, भगवान श्री शंकर, मातालक्ष्मी, गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळकृष्ण यासारख्या अनेक आकर्षक मूर्तीदेखील विक्रीस आहेत; मात्र शिवरायांच्या मूर्ती हातोहात विकल्या जात आहेत. येथील शिवप्रेमींचा उत्साह पाहता आपणदेखील या महाराष्ट्राचा एक भागच आहोत असे वाटते , अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली. खेड-भरणे मार्गावर असलेल्या या व्यावसायिकाने महिनाभरात तब्बल १००हून अधिक शिवप्रतिमांची विक्री केली आहे व अजूनही या प्रतिमांना मागणी वाढतच आहे.