25 वर्षे सुरक्षित सेवा देणाऱ्या चालकांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

25 वर्षे सुरक्षित सेवा देणाऱ्या चालकांचा गौरव
25 वर्षे सुरक्षित सेवा देणाऱ्या चालकांचा गौरव

25 वर्षे सुरक्षित सेवा देणाऱ्या चालकांचा गौरव

sakal_logo
By

rat१२२५.txt

(पान २ साठी)

फोटो ओळी
-rat१२p१४.jpg ः
७५०१९
साडवली ः चालकाचा सत्कार करताना आगार लेखाकार शीला पवार.
----

२५ वर्षे सुरक्षित सेवा देणाऱ्या चालकांचा गौरव

देवरुखात रस्ते सुरक्षा अभियान ; चालक, कर्मचाऱ्यांचे प्रबोधन

साडवली, ता. १२ ः महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत रस्ते सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे. देवरूख आगारातही ११ ते २५ जानेवारी या कालावधीत रस्ते सुरक्षा अभियान राबवले जाणार आहे. या अभियानाचा आरंभ पत्रकार प्रमोद हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी २५ वर्षे सुरक्षित सेवा देणाऱ्या आगारातील चार चालकांचा गौरव करण्यात आला.
आगारात दरवर्षी जानेवारी महिन्यात रस्ते सुरक्षा अभियान राबवले जाते. आगारातील चालक प्रमोद निंबाळकर, संजय कदम व महेंद्र मिरगल यांनी २५ वर्षे सुरक्षित सेवा केल्याबद्दल त्यांचा देवरूख आगारातर्फे आगार व्यवस्थापक राजेश पाथरे यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. बसेसचे अपघात टाळण्यासाठी महामंडळाकडून नियमितपणे अपघात नियंत्रण उपाययोजना करण्यात येत आहेत. या अभियानांतर्गत सर्व आगारातील चालक व यांत्रिक कर्मचारी यांचे प्रबोधन करण्यात येते. देवरूख आगारातही या रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत चालक व यांत्रिक कर्मचारी यांना प्रवाशांच्या सुरक्षिततेसंदर्भात घ्यावयाची काळजी याबाबत मान्यवरांकडून प्रबोधन करण्यात आले. या वेळी देवरूख आगारव्यवस्थापक राजेश पाथरे, माजी निवृत्त कर्मचारी काशिनाथ अणेराव, स्थानकप्रमुख वंदना काजरोळकर, सहाय्य्यक कार्यशाळा अधीक्षक राहुल मलुष्टे, आगार लेखाकार शीला पवार, कार्यालय प्रमुख मनोहर मोहिते, एसटी कर्मचारी संघटना प्रतिनिधी विलास जाधव, विश्वनाथ मोहिरे आदी उपस्थित होते.
--