हेमलता ठरल्या पहिल्या रिक्षा चालक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हेमलता ठरल्या पहिल्या रिक्षा चालक
हेमलता ठरल्या पहिल्या रिक्षा चालक

हेमलता ठरल्या पहिल्या रिक्षा चालक

sakal_logo
By

swt१२३५.jpg
७५०९९
सिंधुदुर्गनगरीः जिल्ह्यातील पहिल्या परवानाधारक रिक्षा चालक महिला ठरलेल्या हेमलता राऊळ यांचा सत्कार प्रसंगी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी. सोबत सीईओ प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी.

हेमलता ठरल्या पहिल्या रिक्षा चालक
सिंधुदुर्गात वेगळी वाटः प्रशासनाकडून परवाना प्रदान
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १२ः तुळस (ता.वेंगुर्ले) येथील हेमलता रवींद्र राऊळ ही महिला पहिली परवानाधारक रिक्षा चालक महिला ठरली आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त त्यांचा जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी सत्कार केला. विना अपघात एसटी चालविणाऱ्या चार चालकांचा सत्कार सुद्धा यावेळी करण्यात आला.
राऊळ यांनी जिल्ह्यातील पहिल्या परवानाधारक रिक्षा चालक महिला बनण्याचा मान मिळविला आहे. सिंधुदुर्गनगरी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे ३३ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा जिल्हास्तरीय शुभारंभ झाला. यावेळी मंजूलक्ष्मी यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, प्रभारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, राष्ट्रीय महामार्ग उप अभियंता अतुल शिवनीवार आदी उपस्थित होते. यावेळी त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याच बरोबर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात सेवा बजावत असताना विना अपघात २८ वर्षे ७ महिने चालक म्हणून काम केलेल्या मधुकर मुंज आणि सुनील पार्टे तसेच २६ वर्षे एक महिना विना अपघात एसटी चालविल्याने रवींद्र सावंत आणि संतोष डीचवलकर या चालकांचा जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी, सीईओ नायर, एसपी अग्रवाल यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिरोडा येथील माऊली महिला मंडळ अध्यक्षा रेखाताई गायकवाड उपस्थित होत्या.