
रुग्णवाहिकेला धडकडून आरोंद्यात दुचाकीस्वार ठार भटपावणीमधील घटना; मृत शिरोड्यातील
75122 - संदीप नाईक
रुग्णवाहिकेला धडकून
आरोंद्यात दुचाकीस्वार ठार
भटपावणीमधील घटना; मृत शिरोड्यातील
सावंतवाडी, ता. १२ ः भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीची रुग्णवाहिकेला जोरदार धडक बसून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. संदीप उत्तम नाईक (४४ रा. शिरोडा-आंब्याचीभाटी-वेंगुर्ला) असे त्यांचे नाव आहे. आरोंदा-भटपावणी येथे बुधवारी (ता.११) रात्री साडेआठच्या सुमारास अपघात झाला. रुग्णवाहिकाचालक प्रवीण प्रभाकर नाईक (रा. आरोंदा-देऊळवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः नाईक गोवा येथून कामावरून दुचाकीने शिरोडा येथे येत होते. समोरून येणाऱ्या रुग्णवाहिकेला त्यांची जोरदार धडक बसली. ते रस्त्यावर कोसळले. अपघातानंतर रुग्णवाहिका चालकाने घटनेची माहिती पोलिसांना दिली. आरोंदा दूरक्षेत्रचे पोलिसांनी त्याच रुग्णवाहिकेतूनच जखमीला शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगतिले.