गुहागरमध्ये आचारसंहितेचा बागुलबुवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागरमध्ये आचारसंहितेचा बागुलबुवा
गुहागरमध्ये आचारसंहितेचा बागुलबुवा

गुहागरमध्ये आचारसंहितेचा बागुलबुवा

sakal_logo
By

rat१२४२.txt

(पान ३ साठी, अॅंकर)

आचारसंहितेच्या बागुलबुवात सरपंचांची विकेट

क्रीडा महोत्सव ; पंचायत समितीच्या आयोजकांची गुगली

गुहागर, ता. १२ : पंचायत समितीने शुक्रवारी (ता. १३) क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात पंचायत समिची अंतर्गत येणारे सर्व अधिकारी व कर्मचारी, पत्रकार आणि सरपंच यांच्यामध्ये क्रिकेट सामने होणार होते. मात्र अचानक या सामन्यांमधून सरपंचांचा संघ वगळण्याचा निर्णय तालुका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी कोकण पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता असल्याचा बागुलबुवा उभा करण्यात आला आहे.

गुहागर पंचायत समितीमध्ये सध्या सांस्कृतिक, कला, क्रीडा महोत्सव सुरू आहे. याच महोत्सवाचा भाग म्हणून उद्या क्रिकेट सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यामध्ये पंचायत समिती कार्यालयीन अधिकारी कर्मचारी, पंचायत समितीचे अन्य कर्मचारी, शिक्षक,यांच्यासह पत्रकार आणि सरपंच यांचे संघही क्रिकेटचे सामने खेळणार आहेत. गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी निमंत्रण दिल्यानंतर सरपंचांनी या सामन्यासाठी मोठी तयारी केली. सरपंच संघटनेचे आकर्षक टी-शर्ट बनवण्यात आले. सर्व सरपंच खेळाडूंसाठी गणवेष तयार केला. दोन दिवस सरपंचांनी क्रिकेट खेळण्याचा सरावही गेला. मात्र आज (ता. १२) सकाळी अचानक आचारसंहितेमुळे आपण खेळू शकत नाही, असा निरोप पंचायत समितीच्या क्रीडा महोत्सव आयोजन समितीने सरपंचांना पाठवला. या संदर्भात सरपंचांनी गटविकास अधिकाऱ्यांना विचारले असता कोकण पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता असल्याने सरपंचांना खेळण्यास अडचण येऊ शकते. म्हणून आपला संघ स्पर्धेतून काढला आहे. आपण पुन्हा केव्हा तरी अशी स्पर्धा भरवू. हा निर्णय वरिष्ठांचा असल्यामुळे आपल्याला मानावा लागेल. असे सांगून सरपंचांची बोलवण केली. त्यानंतर क्रिकेट सामने खेळता यावेत म्हणून सरपंचांनी तहसीलदार प्रतिभा वराळे यांची देखील भेट घेतली. मात्र त्यांनी देखील आचारसंहितेचा अडचण असल्याचे सांगितले. यामुळे सर्व सरपंच वैतागले आहेत. दैनिक सकाळशी बोलताना सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. सरपंच क्रिकेट खेळल्याने कोकण पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता कशी भंग होते, असा प्रश्न सरपंचांसह तालुक्यातील अनेक ग्रामस्थांना पडला आहे.