जन्मावर आणि जगण्यावर शतदा प्रेम करणारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जन्मावर आणि जगण्यावर शतदा प्रेम करणारे
जन्मावर आणि जगण्यावर शतदा प्रेम करणारे

जन्मावर आणि जगण्यावर शतदा प्रेम करणारे

sakal_logo
By

rat१३१८.txt

(टुडे पान ३ साठी)
(टीप- मंगेश पाडगावकरांचा फोटो घ्यावा.)

(७ जानेवारी पान दोन)

इये साहित्याचिये नगरी ..............लोगो

फोटो ओळी
-rat१३p१२.jpg ः
७५२२४
प्रकाश देशपांडे

--
जन्मावर आणि जगण्यावर
शतदा प्रेम करणारे मंगेश पाडगावकर
75250
मराठी कविता घरोघर घेऊन जाणारी त्रयी म्हणजे करंदीकर, बापट आणि पाडगावकर. १९६०-७० च्या दशकात या तिघांनी आपल्या कवितांनी रसिकांच्या मनावर गारूड केले होते. त्यातही मोठमोठे डोळे, बुल्गानीन छाप दाढी आणि आवाजात विलक्षण जादू असलेले मंगेश पाडगावकर. या अपरान्त भूमीने मराठी साहित्यविश्‍वाला दिलेला हा भावकवी.


मंगेश पाडगावकरांचा जन्म आजच्या सिंधुदुर्ग जिल्हातल्या वेंगुर्ला इथे १० मार्च १९२९ ला झाला. चौथीपर्यंतचे शिक्षण वेंगुर्ल्यात झाल्यानंतर मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मुंबर्इच्या विल्सन हायस्कूल येथे झाले. पुढे मराठी आणि संस्कृत विषय घेऊन त्यांनी एमए पदवी प्राप्त केली. पाडगावकरांना लहानपणापासून कवितेची आवड होती. त्यांच्या मातोश्रींना कवितेची आवड असल्याने घरातच कवितेचे वातावरण होते. वयाच्या १४व्या वर्षापासून त्यांनी कविता लेखनाला सुरवात केली. राष्ट्र सेवादलाचे संस्कार असल्याने समाजवादी विचारांना वाहिलेल्या ‘साधना’ साप्ताहिकात त्यांनी १९५० ते १९५५ पर्यंत सहसंपादक म्हणून काम केले़. पुढे दोन वर्षे रूर्इया कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून व त्यानंतर आकाशवाणीवर १९६४ ते १९७० पर्यंत प्रोड्युसर आणि पुढे युनायटेड स्टेटस् इन्फर्मेशन सर्व्हिस (युसिस) संस्थेत मराठी विभागाचे संपादक म्हणून काम केले.

पाडगावकरांच्या कवितेवर प्रारंभी बोरकर आणि कुसुमाग्रजांच्या कवितेचा प्रभाव होता; मात्र काही काळानंतर या प्रभावातून दूर होऊन त्यांच्या कवितेने स्वतःची वाट चोखाळली. ’धारानृत्य‘ हा पाडगावकरांचा पहिला कवितासंग्रह. या संग्रहातल्या कवितांवर लिहिल्याप्रमाणे बोरकर आणि कुसुमाग्रजांच्या काव्याची छाप दिसत होती; मात्र त्यानंतर आलेल्या ’जिप्सी‘ मधल्या कवितांमध्ये पाडगावकरांना स्वतःचा सूर सापडला, असे जाणवते. रसिकांनीही ’जिप्सी‘ चे भरभरून स्वागत केले. या काव्यसंग्रहाच्या अनेक आवृत्या प्रकाशित झाल्या. पाडगावकर हे त्यांच्या गीतांमुळे घरोघरी पोचले. मराठी भाषा ज्याला येते असा एकही माणूस नसेल ज्याला पाडगावकरांच्या गीताची मोहिनी पडली नाही. ’शुक्रतारा मंदवारा’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, या ‘जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘तुझे गीत गाण्यासाठी ’अशी अनेक भावगीते रसिकांच्या मनामनात गुंजत असतात. पाडगावकर हे भावजीवी आणि सौंदर्यजीवी कवी होते. निसर्गाची विविध रूपे त्यांना भावतात. त्यांच्या कवितेतून निसर्गाची अनंत रूपे दिसतात. ’मी चंचल होऊन आले, भरतीच्या लाटांपरी उधळित जीवन स्वैर निघाले’ अशी ‘भरतीची लाट’ त्यांच्या काव्यात ठायीठायी दिसते. निसर्गाची भव्यता, त्याची अद्भुत शक्ती, अनाकलनीय इशारे पाडगांवकर कवितेतून दाखवतात. या निसर्गसौंदर्याच्या वेडामुळेच आपल्याला अस्थिरतेचा शाप मिळालाय, असं पाडगावकरांनीच म्हटलंय. तरीही ते ‘आनंददायी’च असतात.
प्रकाशाचा गर्भ
जलवंती पोटी
अखंडनूतन मला ही धरित्री
आनंदयात्री मी आनंदयात्री
असं म्हणत स्वतःला आनंदयात्री म्हणवतात. कारण, पाडगावकरांना जीवनाची प्रचंड ओढ आहे. त्यांच्या अनेक कवितांमधूनही ओढ जाणवते. निसर्गाच्या विविध विभ्रमांचे दर्शन घेता घेता हे विभ्रम निर्माण करणाऱ्या अज्ञात शक्तीशींही ते संवाद साधतात. त्यांना ती दिव्यशक्ती दिसते.
''तुला पहिले ऋतुऋतूने, फळाफळातून
त्या गगनातून, या मातीतून, स्थितीगतीतून'' असे म्हणून पुढे म्हणतात.
''रे कसे शोधू तूज वेड्यापरि मी तुलाच टाकून
मी कधीच नाही म्हटले की, तू दे मज दर्शन, असा परमेश्‍वरभेटीचा आनंदसोहळा हा आनंदयात्री चराचरसृष्टीत पाहतो.
पाडगावकरांनी कवितेचे विविध प्रकार अनुसरले. वात्रटिका, भाषांतरित कविता, नाट्यकविता, विडंबन कविता, गीत, गझल, बोलगाणी, बालकविता असे विविध प्रकार त्यांच्या कवितेतून दिसतात. सेवादलाचे संस्कार असल्याने १९७५ ला आलेल्या आणीबाणीतून आलेल्या अस्वस्थतेचे प्रतिबिंब उमटलेली त्यांची ‘सलाम’ कविता गाजली. ‘सलाम’ कवितासंग्रहाला प्रचंड लोकप्रियता लाभली. हा कवितासंग्रह १९७८ ला आला; मात्र राजकारणातील अधोगती, इथली मुर्दाड नोकरशाही, वंचितांचे होणारे शोषण पाडगावकरांना आणीबाणी पूर्वीपासूनच अस्वस्थ करत होते. १९६५ पासून त्यांनी सामाजिक, राजकीय दंभाचा उपहास करणाऱ्या कविता लिहायला प्रारंभ केला होता. आणीबाणी हा या अस्वस्थेचा कळसाध्याय होता. राजकीय नेत्यांची हुजरेगिरी करणारे अनुयायी होणारे, अन्याय अत्याचार निमूटपणे बघणारे जनसामान्य यांचे विदारक दर्शन सलाम कविता घडवते.
ज्याच्या हातात दंडा
त्याला सलाम
लाथेच्या भयाने...
असं सांगून पुढे म्हणतात.
भीतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम. हीच अस्वस्थता घेऊन पाडगावकरांचा ‘उदासबोध’ आला, ‘वात्रटिका’ आल्या आणि मध्यमवर्गीयांचा खास प्रतिनिधी ‘मोरू’ही आला. त्यांचा ‘उदासबोध’ म्हणजे आचार्य अत्रे यांच्या ‘झेंडुची फुले’ या विडंबन काव्याच्या परंपरेत बसणारी कविता आहे. समर्थ रामदासांनी दासबोध लिहिला. त्यातून त्यांनी भक्तीमार्गाबरोबरच समाजप्रबोधन आणि राष्ट्रकार्य हा विचार मांडला होता. वर्तमानकाळातही राजसत्ता देशरक्षणाऐवजी भ्रष्टाचार, गुंडगिरी पोसायला लागते तेव्हा त्यांना आरसा दाखवतो पाडगावकरांचा ‘उदासबोध’.
समर्थ रामदास म्हणतात,
समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे.
तर पाडगावकर आजची स्थिती सांगतात
समर्थाचिया सेवका वक्र पाहे
ऐसा गल्लीगल्लीत गुंड आहे.
पाडगावकरांच्या समाजभानाचे दर्शन त्यांच्या अशा अनेक कवितांमधून घडते. पाडगावकरांनी लिहिलेली बालगीतेही गाजली. ‘सांग सांग भोलेनाथ’ शिशुगटाच्या प्रत्येक वर्गात म्हटले जातेच. पाडगावकरांना शाळेत ’बायबल‘ शिकवले जायचे. मिशनऱ्यांनी केलेल्या बायबलच्या भाषांतरापेक्षा चांगले भाषांतर करावे म्हणून पाडगावकरांनी ‘बायबल नवा करार भाषांतर आणि मुक्त चिंतन’ लिहून प्रसिद्ध केले. याशिवाय मीराबार्इंच्या पदांचा स्वैर अनुवाद केला. कबिराचे दोहे मराठीत आणले. शेक्सपिअरच्या रोमिओ अ‍ॅन्ड ज्युलियट, ज्युलिअस सिझरचे भाषांतर केले. पाडगावकरांना त्यांच्या साहित्यिक क्षेत्रातील गौरवास्पद कार्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले. १९९२ ला चिपळूण येथे कवी माधवांच्या जन्मशताब्दीनिमित्त पहिले ‘पहिले कोकण मराठी साहित्यसंमेलन’ झाले. या संमेलनाचे अध्यक्ष होते मंगेश पाडगावकर. २०१० ला दुबर्इला झालेल्या दुसऱ्या मराठी विश्‍वसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. ३० डिसेंबर २०१५ ला आनंदयात्री निजधामी गेला.

---