आपदा मित्र प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपदा मित्र प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ
आपदा मित्र प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

आपदा मित्र प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

sakal_logo
By

rat१३७.txt


(टुडे पान २ साठी)

फोटो ओळी
-rat१३p२२.jpg-
७५२६९
रत्नागिरी ः आपदा मित्र प्रशिक्षणात सहभागी स्वयंसेवक आणि मान्यवर.

आपदा मित्र प्रशिक्षण शिबिरास सुरवात

पावस, ता. १३ ः राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे आपदा मित्र बॅच क्र. २ च्या प्रशिक्षणाचे उदघाटन शुक्रवारी (ता. १३) रत्नागिरी येथे झाले. या वेळी जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, पोलिस उपअधीक्षक (गृह) सुदाम माने, तहसीलदार सर्वसाधारण हणमंत म्हेत्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक (सुरक्षा शाखा) अविनाश केदारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते. या बॅचचे १२ दिवसांचे निवासी प्रशिक्षण असून ५३ स्वयंसेवकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे.