एसटी पूर्ववत सुरू करा

एसटी पूर्ववत सुरू करा

rat१३.txt

(पान ६ साठी)

पूर्ववत एसटी सेवेसाठी मंत्र्यांना साकडे

माखजन पंचक्रोशी ; रास्ता रोको आंदोलनाचा इशारा


सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ ः कोविड-१९ पुर्वी एसटी महामंडळाच्या नियमित सुरु असलेल्या एसटी फेऱ्या नियमित कराव्यात अशी मागणी माखजन पंचक्रोशी प्रवासीवर्ग, विद्यार्थीवर्ग, ग्रामपंचायत क्षेत्र, कर्मचारी व्यापारी मंडळ व सर्वपक्षीय संघटना यांनी केली आहे. यासाठी आगार व्यवस्थापक देवरुख (ता. संगमेश्वर) यांना निवेदन दिले आहे. मात्र बस सेवा पूर्ववत न झाल्यास माखजन एसटी बस स्थानकसमोर रास्ता रोको आंदोलनाची छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोविड-१९ पूर्वी एसटी महामंडळाच्या देवरुख आगारातून माखजन कोल्हापूर, माखजन रत्नागिरी, करजुवे-मुंबई, करजुवे-चिपळूण व्हाया माखजन रत्नागिरी, माखजन-आरवली-माखजन अशा दोन मिनी बस फेऱ्या अर्धा-अर्धा तासाने नियमित सुरु होत्या. परंतु कोविड-१९ संपल्यानंतर बसेस सेवा पुन्हा सुरू करणे क्रमप्राप्त होते. मात्र आजपर्यत या एसटी सेवा पुर्ववत करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात येण्याजाण्याची गैरसोय होत आहे. ती टाळण्यासाठी वेळापत्रकाप्रमाणे बस सेवा सुरु करण्यात याव्यात. या निवेदनाचा सहानभूतीपुर्वक विचार करुन २० जानेवारी पर्यंत बस सेवा सुरु न झाल्यास माखजन एसटी बसस्थानक समोर २१ जानेवारीला रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. त्याची सर्वस्वी जबाबदारीही एसटी महामंडळाची राहिल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनाची प्रत विभागीय वाहतूक नियंत्रक .रत्नागिरी, राज्याचे परिवहन मंत्री, संगमेश्वर चिपळूण विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम, रत्नागिरी जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी देण्यात आली आहे. लवकरात लवकर या एसटी सेवांसदर्भात विचार व्हावा अशी मागणी माखजन पंचक्रोशीतील ग्रामस्थ, विद्यार्थी, कर्मचारी, ग्रामपंचायत क्षेत्र, सर्वपक्षीय संघटना यांनी केली आहे.
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com