रत्नागिरी- कॅरम स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- कॅरम स्पर्धा
रत्नागिरी- कॅरम स्पर्धा

रत्नागिरी- कॅरम स्पर्धा

sakal_logo
By

पेशवाई माघी गणेशोत्सवानिमित्त
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा
रत्नागिरी, ता. १५ : येथील मारुती आळीतील श्रीमंत पेशवाई माघी गणेशोत्सव आणि श्री हनुमान मित्र मंडळातर्फे जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या संयुक्‍त विद्यमाने ही स्पर्धा श्री राधाकृष्ण मंदिरात २८ आणि २९ जानेवारीला होणार आहे.
स्पर्धेत ब्रेक टू फिनिश व ब्लॅक टू फिनिश नोंदविणाऱ्या खेळाडूंना प्रथम फेरीपासून खास रोख पारितोषिके देण्यात येतील. स्पर्धा पुरुष एकेरी, महिला एकेरी, किशोर गट, किशोरी गट, कुमार गट आणि कुमारी गट अशा ६ गटांत खेळविली जाणार आहे. स्पर्धा अखिल भारतीय कॅरम फेडरेशन (राष्ट्रीय संघटना) आणि आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशनच्या प्रचलित स्पर्धा नियमावलीनुसार होईल. या क्रीडा वर्षातील ही पाचवी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क आहे. प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवश्यक आहे. अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करण्यात येईल. स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून राज्यस्तरीय कॅरम पंच मंदार दळवी आणि सागर कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.
स्पर्धकांनी प्रवेशिका २४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतच स्पर्धा शुल्कासहित खालील ठिकाणी द्यावयाच्या आहेत. प्रवेश अर्जासाठी गुहागर- प्रदीप परचुरे, चिपळूण- साईप्रकाश कानिटकर, देवरूख- मोहन हजारे, रत्नागिरी- विनायक जोशी, संगमेश्वर- मनमोहन बेंडके, खेड- योगेश आपटे यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन श्री हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष मंगेश संसारे आणि रत्नागिरी जिल्हा कॅरस असोसिएशनतर्फे अध्यक्ष प्रदीप भाटकर यांनी केले आहे.