ठाकरे शिवसेनेच्या तालुकाप्रमुखपदी संदीप कांबळे

ठाकरे शिवसेनेच्या तालुकाप्रमुखपदी संदीप कांबळे

फोटो ओळी

-rat15p17.jpg- संदीप कांबळे
-----------
ठाकरे शिवसेनेच्या तालुकाप्रमुखपदी संदीप कांबळे
खेड ः उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या तालुका पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सेनाभवन येथून जाहीर करण्यात आल्या. तालुकाप्रमुखपदी संदीप कांबळे, शहरप्रमुखपदी दर्शन महाजन यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेना संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याने संदीप कांबळे आणि शहरप्रमुख दर्शन महाजन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तालुका पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांनुसार ज्येष्ठ शिवसैनिक मनोज भोसले यांची तालुका सचिवपदी वर्णी लागली आहे. तालुका महिला संघटकपदाची जबाबदारी अंकिता बेलोसे, खेड शहर महिला संघटक- माधवी बेर्डे, उपतालुकाप्रमुख- सचिन निकम, विभागप्रमुख- अंकुश कदम, विश्वास कदम, सुरेश मोरे, स्वप्नील पाटील, विभागीय महिला संघटकपदी अक्षता साळुंखे, उपशहरप्रमुखपदी रमेश घटे, चंदरशेखर पाटणे, नीलेश जोशी, राजन महाकाल, उपविभाग महिला संघटक म्हणून संजय भुवड, विभागीय सचिव म्हणून ज्ञानदेव निकम, उपविभागप्रमुखपदी संतोष चाळके, दिलीप निकम, संजय मोडसिंग, उमेश घाणेकर, सुदर्शन कदम, सुभाष मोरे यांची नियुक्त करण्यात आली आहे.

कृषी महाविद्यालयाचे कळंबटला निवासी शिबिर
चिपळूण ः शरदचंद्रजी पवार कृषि व अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत निवासी शिबिर कळंबट येथे झाले. शिबिरात गावांमध्ये महाविद्यालयातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. पायवाट, पाखाडया यांची साफसफाई, बंधारा बांधणे, शोषखड्डे मारणे, व्यक्तिगत विकास व प्रबोधनात्मक व्याख्याने, घनकचरा व्यवस्थापन उपक्रम राबविण्यात आले. शिबिराचे उदघाटन न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याद्यापक लक्ष्मण ढेंगे व गावप्रमुख प्रकाश घाणेकर यांच्या हस्ते झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com